औषधविक्री करणा-या अ‍ॅपविरोधात ‘एफडीए’त तक्रार  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 05:56 AM2018-03-06T05:56:29+5:302018-03-06T05:56:39+5:30

एका औषधविक्री करणाºया अ‍ॅपविरोधात अन्न व औषध प्रशासन विभागाकडे तक्रार करण्यात आली आहे. आॅल फूड अँड ड्रग्स लायन्सस होल्डर्स असोसिएशनने ही तक्रार केली असून

 Complaint against 'FDA' against drug appraisal app | औषधविक्री करणा-या अ‍ॅपविरोधात ‘एफडीए’त तक्रार  

औषधविक्री करणा-या अ‍ॅपविरोधात ‘एफडीए’त तक्रार  

Next

मुंबई - एका औषधविक्री करणाºया अ‍ॅपविरोधात अन्न व औषध प्रशासन विभागाकडे तक्रार करण्यात आली आहे. आॅल फूड अँड ड्रग्स लायन्सस होल्डर्स असोसिएशनने ही तक्रार केली असून औषध व सौंदर्य प्रसाधन कायद्याचे उल्लंघन केले असल्याचे नमूद केले आहे.
आॅल फूड अँड ड्रग्स लायन्सस होल्डर्स असोसिएशनने अन्न व औषध प्रशासनाकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की या अ‍ॅपद्वारे प्रादेशिक वृत्तपत्रांत आणि अन्य माध्यमांमध्ये चुकीच्या पद्धतीने जाहीरात करण्यात येत आहे.
औषधांची विक्री ही डॉक्टरांच्या प्रिस्क्रीप्शनशिवाय करणे चुकीचे आहे, त्यामुळे रुग्णाच्या जीवालाही धोका संभावू शकतो हे लक्षात घेऊन अन्न व औषध प्रशासन विभागाने या तक्रारीची दखल घेऊन त्वरित कारवाई करण्याची मागणी असोसिएशनने केली आहे. आपल्याकडे अजूनही आॅनलाइन औषध विक्रीला बंदीला मान्यता नाही, त्यामुळे अशा जाहीरांतीमुळे रुग्णांची फसवणूक होते असेही या तक्रारीत असोसिएशनचे अभय पांडे यांनी म्हटले आहे.

Web Title:  Complaint against 'FDA' against drug appraisal app

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.