मंत्र्यांच्या पीएविरुद्ध विनयभंगाची तक्रार

By admin | Published: June 21, 2016 03:38 AM2016-06-21T03:38:49+5:302016-06-21T03:38:49+5:30

आरोग्य खात्यातील बदल्यांमधील भ्रष्टाचार आणि बदल्यांमधील अर्थपूर्ण व्यवहारांमुळे आरोपांच्या घेऱ्यात असलेले आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत यांचे खासगी सचिव सुनील माळीविरुद्ध

Complaint against the PA against the MP | मंत्र्यांच्या पीएविरुद्ध विनयभंगाची तक्रार

मंत्र्यांच्या पीएविरुद्ध विनयभंगाची तक्रार

Next

मुंबई : आरोग्य खात्यातील बदल्यांमधील भ्रष्टाचार आणि बदल्यांमधील अर्थपूर्ण व्यवहारांमुळे आरोपांच्या घेऱ्यात असलेले आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत यांचे खासगी सचिव सुनील माळीविरुद्ध एका वैद्यकीय अधिकारी महिलेने मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे माळी यांना आज सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले.
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात एका प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी असलेल्या एका वैद्यकीय अधिकारी महिलेशी माळी यांनी गैरवर्तणूक केली होती. याबाबत संबंधित महिलेने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दोन दिवसांपूर्वी तक्रार केली होती. त्यानंतर आज मुंबईत येऊन मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात माळींविरुद्ध विनयभंगाची तक्रार दाखल केली. चार तास ही महिला पोलीस ठाण्यात ठाण मांडून होती, त्यानंतर कुठे पोलिसांनी तक्रार दाखल करवून घेतली. पण रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल केला नव्हता. सूत्रांनी सांगितले की, ‘आपण तक्रार करू नका’असा फोन एका मंत्र्यांने संबंधित डॉक्टर महिलेस केला होता.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला सांगितले की, कथित घटना १६ मार्चला घडलेली होती. आता तिने तीन महिन्यांनंतर तक्रार केलेली आहे. तिची शाहनिशा करुनच गुन्हा दाखल करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. (विशेष प्रतिनिधी)

माळी यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही आणि आरोग्य मंत्र्यांनी त्यांची हकालपट्टी केली नाही तर मंगळवारपासून आपण आझाद मैदानावर बेमुदत उपोषणाला बसणार असल्याचे वैद्यकीय अधिकारी महिलेने लोकमतला सांगितले. आपल्या या आंदोलनाला आरोग्य अधिकरी, कर्मचारी आणि त्यांच्या संघटनांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

डॉ. सावंत मुख्यमंत्र्यांकडे
आरोग्य खात्यात बदल्यांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराचे आरोप आणि पीए सुनील माळीने एका वैद्यकीय अधिकारी महिलेचा केलेला कथित विनयभंग या पार्श्वभूमीवर, आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयात भेट घेऊन सफाई दिली, असे सूत्रांनी सांगितले. विनयभंगाच्या प्रकरणाची चौकशी आरोग्य विभागाच्या प्रधान सचिव सुजाता करतील, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.

थातूरमातूर कारवाई
बदल्यांचे घोटाळे आणि विनयभंगासारख्या तक्रारी असताना सुनील माळी यांना केवळ सक्तीच्या रजेवर पाठविल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ते उपजिल्हाधिकारी असून प्रतिनियुक्तीवर मंत्री कार्यालयात आलेले आहेत. तथापि, आरोग्य मंत्री सावंत यांनी प्रसार माध्यमांना सांगितले की, कुणालाही पाठीशी घालण्याची भूमिका मी घेणार नाही पण कुणावर अन्यायदेखील होऊ देणार नाही.

Web Title: Complaint against the PA against the MP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.