‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेविरुद्ध पोलिसात तक्रार

By admin | Published: March 2, 2016 03:38 AM2016-03-02T03:38:03+5:302016-03-02T03:38:03+5:30

‘झी मराठी’वाहिनीवरील ‘रात्रीस खेळ चाले...’ या मालिकेच्या माध्यमातून अंधश्रद्धेला खतपाणी घालण्यात येत आहे. त्याचा विपरीत परिणाम कोकणातील पर्यटन व्यवसायावर होणार असल्याने ही मालिका त्वरित बंद करावी

Complaint against police in 'Night game play' | ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेविरुद्ध पोलिसात तक्रार

‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेविरुद्ध पोलिसात तक्रार

Next

चिपळूण : ‘झी मराठी’वाहिनीवरील ‘रात्रीस खेळ चाले...’ या मालिकेच्या माध्यमातून अंधश्रद्धेला खतपाणी घालण्यात येत आहे. त्याचा विपरीत परिणाम कोकणातील पर्यटन व्यवसायावर होणार असल्याने ही मालिका त्वरित बंद करावी, अशी मागणी चिपळुणमधील काही नागरिकांनी मंगळवारी पोलिसांकडे निवेदनाद्वारे केली आहे. या मालिकेचे निर्माते, दिग्दर्शक यांच्यावर बदनामीचा व जादूटोणाविरोधी कायद्याखाली गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.
दरम्यान, आपण माजी खासदार नीलेश राणे यांची भेट घेणार असून, या मालिकेत कोकणची सकारात्मक बाजू दाखवू आणि मालिकेबद्दल माहिती देऊ, असे दिग्दर्शक राजू सावंत म्हणाले. (प्रतिनिधी)

Web Title: Complaint against police in 'Night game play'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.