मुख्यमंत्री, आमीरविरोधात शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार
By admin | Published: February 21, 2017 05:42 PM2017-02-21T17:42:48+5:302017-02-21T17:48:13+5:30
शिवसेनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बॉलिवूड अभिनेता आमीर खान आणि मुंबई फर्स्ट या स्वयंसेवी संस्थेच्याविरोधात निवडणूक आयोगात आचारसंहिताभंगाची तक्रार दाखल केली आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 21 - शिवसेनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बॉलिवूड अभिनेता आमीर खान आणि मुंबई फर्स्ट या स्वयंसेवी संस्थेच्याविरोधात निवडणूक आयोगात आचारसंहिताभंगाची तक्रार दाखल केली आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराची वेळ संपल्यानंतर मुंबई फर्स्टच्या माध्यमातून मंगळवारी वृत्तपत्राला जाहिराती देण्यात आल्या आहेत. या जाहिरातींमध्ये बॉलिवूड अभिनेता आमीर खानचा फोटो वापरण्यात आला आहे. तसेच, पारदर्शकतेला मतदान करा, असे आवाहनही करण्यात आले आहे. दरम्यान, याप्रकरणी युवासेनेचे वकील धमेंद्र मिश्रा यांनी ही तक्रार दाखल केली आहे. तसेच, या जाहिरातींवर शिवसेनेने आक्षेप घेतला आहे.
याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रचार संपल्यानंतर माध्यमांना मुलाखती दिल्याचे सांगत त्यांच्याविरोधात सुद्धा शिवसेनेकडून निवडणूक आयोगात तक्रार दाखल करण्यात आली आहे.