त्या दांडीबहाद्दरांविरोधात तक्रार

By admin | Published: May 15, 2014 02:49 AM2014-05-15T02:49:57+5:302014-05-15T02:49:57+5:30

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदाची निवडणूक २९ एप्रिल २०१४ पार पडली़ स्थायी समितीत कोणत्याच पक्षाला बहुमत नसल्याने सभापतीपदी कोणाला बसवायचे,

Complaint against those Dankibadhadars | त्या दांडीबहाद्दरांविरोधात तक्रार

त्या दांडीबहाद्दरांविरोधात तक्रार

Next

कल्याण : स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीत अनुपस्थित राहून पक्षविरोधी भूमिका घेणार्‍या काँग्रेसचे साबीर कुरेशी, राष्ट्रवादीचे जव्वाद डोन आणि विकास म्हात्रे सदस्यांचे नगरसेवकपद रद्द करण्यासंदर्भात संबंधित पक्षांच्या वतीने उद्या १५ मे रोजी कोकण विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली जाणार आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदाची निवडणूक २९ एप्रिल २०१४ पार पडली़ स्थायी समितीत कोणत्याच पक्षाला बहुमत नसल्याने सभापतीपदी कोणाला बसवायचे, हा निर्णय सर्वस्वी विरोधी पक्षांच्या हातात होता. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष असलेल्या मनसेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी सदस्यांच्या सहकार्याने सत्ताधारी शिवसेनेचा पराभव करण्याचे मनसुबे आखले होते. परंतु, आघाडीच्या तीन सदस्यांनी ऐनवेळी दगाफटका केल्याने त्यांचे मनसुबे धुळीस मिळाले. दरम्यान पक्षाच्या वतीने व्हीप बजावूनही अनुपस्थित राहून अप्रत्यक्षरीत्या शिवसेनेला सहकार्य करणार्‍या आघाडीच्या सदस्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची भूमिका काँग्रेस आणि राष्ट्रवादीने घेतली आहे. त्यानुसार गुरुवारी काँगे्रसचे जिल्हाध्यक्ष तथा गटनेते सचिन पोटे आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील हे कोकण विभागीय आयुक्तांची भेट घेऊन त्या तिघा सदस्यांचे नगरसेवकपद रद्द करण्यासंदर्भात तक्रार दाखल करणार आहेत. नगरसेवकपद रद्द झाल्यानंतर त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येणार असल्याचे पक्षाने आधीच स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Complaint against those Dankibadhadars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.