असदुद्दीन ओवैसींविरोधात भाजपाची निवडणूक आयोगात तक्रार

By admin | Published: January 2, 2017 04:57 PM2017-01-02T16:57:08+5:302017-01-02T17:51:25+5:30

लोकसंख्येच्या आधारावर महापालिकेचे बजेट मुस्लिम धर्मियांना मिळावे असे भडकावू वक्तव्य करणाऱ्या खासदार असुदद्दीन ओवैसी यांची चौकशी करावी, अशी तक्रार मुंबई भाजपाने राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे.

Complaint in BJP's Election Commission against Asaduddin Owaisi | असदुद्दीन ओवैसींविरोधात भाजपाची निवडणूक आयोगात तक्रार

असदुद्दीन ओवैसींविरोधात भाजपाची निवडणूक आयोगात तक्रार

Next

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 2 - लोकसंख्येच्या आधारावर महापालिकेचे बजेट मुस्लिम धर्मीयांना मिळावे असे भडकावू आणि बेकायदेशीर वक्तव्य करणाऱ्या खासदार असदुद्दीन ओवैसी यांची चौकशी करावी, अशी तक्रार मुंबई भाजपाने राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. मुंबई येथील नागपाडा येथे ओवैसी यांनी घेतलेल्या सभेत लोकसंख्येच्या आधारावर मुस्लिम धर्मीयांना महापालिकेच्या बजेटची टक्केवारी मिळावी, अशी मागणी केली होती. 
 
यावर मुंबई भाजपाने विरोध करत निषेधही केला आहे.  याबाबत मुंबई भाजपाचे महामंत्री सुमंत घैसास यांनी राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहून या प्रकरणी त्यांच्या वक्तव्याची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यांचे वक्तव्य समाजात धार्मिक तेढ निर्माण करणारे आहे, जातीय सलोखा बिघडवणारे आहे. त्यासोबतच जाती धर्म आणि भाषेच्या नावावर मते मागता येणार नाहीत. 
 
सर्वोच्च न्यायालयाने आजच दिलेल्या आदेशाच्या विरुद्ध असून असे वक्तव्य हे मुस्लिम समाजाचे सुद्धा नुकसान करणारे आहे. त्यामुळे याची चौकशी व्हावी, अशी मागणी मुंबई भाजपा महामंत्री सुमंत घैसास यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात केली आहे.
 
दरम्यान याबाबत इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुंबई भाजपा अध्यक्ष आणि आमदार अॅड. आशिष शेलार म्हणाले की, आम्हाला कुठलीच टक्केवारी मान्य नाही. जाती - धर्मामध्ये तेढ निर्माण करणारी टक्केवारी मागणाऱ्या ओवैसी यांचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. सबका साथ सबका विकास हाच भाजपाचा नारा असून सर्व जाती धर्माच्या समाज घटकांना समान न्याय देण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. त्यामुळे अशी डोकी भडकावणाऱ्या वक्तव्याची चौकशी होऊन त्यावर कारवाई करावी अशी भाजपाची भूमिका आहे, असेही आमदार अॅड. आशिष शेलार यांनी स्पष्ट केले.                        

 

Web Title: Complaint in BJP's Election Commission against Asaduddin Owaisi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.