प्रियकराच्या आत्महत्येप्रकरणी प्रेयसीवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2018 09:07 PM2018-11-06T21:07:59+5:302018-11-06T21:10:50+5:30

त्यांचे गेल्या ५ वर्षांपासून प्रेम संबंध होते. तरुणीने लग्नाचे दिलेले वचन न पाळता त्याला लग्न करण्यास नकार दिला आहे.

complaint filed against girlfriend to provoke boyfriend for suicide | प्रियकराच्या आत्महत्येप्रकरणी प्रेयसीवर गुन्हा दाखल

प्रियकराच्या आत्महत्येप्रकरणी प्रेयसीवर गुन्हा दाखल

googlenewsNext

पुणे : पाच वर्षांच्या ओळखीनंतर लग्न करण्याचे दिलेले वचन न पाळल्याने एका इंजिनिअर तरुणाने पुण्यातील हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

              आदर्श सुरेंद्र चिकटे (वय २७, रा. मालेगाव बाजार, ता. तेलारा, जि. अकोला) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी आदर्श याची आई लता चिकटे (वय ५१) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, वाशिम जिल्ह्यातील २६ वर्षाच्या तरुणीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

            पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही तरुणी आणि आदर्श अमरावती येथील एका इंजिनिअरींग महाविद्यालयात इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅड टेलिकम्युनिकेशन शाखेत शिक्षण घेतले आहे. त्यामुळे त्यांची ओळख असून, त्यांचे गेल्या ५ वर्षांपासून प्रेम संबंध होते. दरम्यान, तरुणी मुळची वाशिम जिल्ह्यातील असून, शिक्षणानंतर ती नोकरीनिमित्त पुण्यात राहण्यास आहे. तर, आदर्श हा गावीच होता. दरम्यान त्यांनी लग्न करण्याचे ठरविले होते. आदर्श अधून-मधून तरुणीला भेटण्यासाठी पुण्यात येत असे. गेल्या महिन्यात पुण्यात आला होता. यानंतर तो डेक्कन येथील ऋतुगंधा हॉटेलास राहण्यास होता. दरम्यान तरुणीने लग्नाचे दिलेले वचन न पाळता त्याला लग्न करण्यास नकार दिला आहे. या नैराशातून तरुणाने २४ आॅक्टोंबरला हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मुलाच्या आईने फिर्याद दिली असून त्यातून पुढे आलेल्या माहितीवरुन संबंधित तरुणीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे़. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक एस़ आऱ काटे करीत आहेत़. 

Web Title: complaint filed against girlfriend to provoke boyfriend for suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.