दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2024 01:35 PM2024-05-07T13:35:32+5:302024-05-07T13:36:39+5:30

Lok Sabha Election 2024 : दत्ता भरणे यांच्या धमकीमुळे मतदानादरम्यान राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. तसेच, नव्या राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

Complaint from Supriya Sule to Election Commission against Datta Bharane after he threats voters, Baramati Lok Sabha Election 2024 | दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!

दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!

Baramati Lok Sabha Election 2024 : बारामती लोकसभा मतदारसंघात संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघात सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढत आहे. पहिल्यांदाच पवार विरुद्ध पवार सामना लोकसभेला होत आहे. यामुळे हा मतदारसंघ महत्वाचा मानला जात आहे. दरम्यान, बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापुरात आमदार दत्ता भरणे यांच्यावर मतदारांना धमकी दिल्याचा आरोप आहे. दत्ता भरणे यांच्या धमकीमुळे मतदानादरम्यान राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. तसेच, नव्या राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, बारामती लोकसभेच्या राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी दत्ता भरणे यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. यामुळे दत्ता भरणे यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या तक्रारीत सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, दत्ता भरणे त्यांच्या गावातील आणि आसपासमधील गावातील लोकांना शिवीगाळ करून धमकावत आहेत. या घटनेचा व्हिडिओ सुप्रिया सुळे यांनी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे पाठवला आहे. 

दत्ता भरणे यांचा हा धमकीचा व्हिडिओ पोस्ट करत राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनी गंभीर आरोप केले आहेत. आमदार रोहित पवार यांनी एक व्हिडीओ ट्विट केला आहे. या व्हिडीओत इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे कार्यकर्त्यांना बोलत असल्याचे दिसत आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये पवार यांनी भरणेंवर धमकी दिल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर भरणे यांनी स्पष्टीकरण दिले होते. मी दोन कार्यकर्त्यांमधील वाद सोडवत होतो, असे स्पष्टीकरण भरणे यांनी दिले.

रोहित पवार यांच्या पोस्टमध्ये काय?
"केवळ दडपशाहीपुढं न झुकता स्वाभिमानाने बुथवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना अजितदादा मित्र मंडळाचे सदस्य, माजी मंत्री आणि इंदापूरचे आमदार हे कशा अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करतात आणि धमकी देतात ते या व्हिडिओत बघा… विशेष म्हणजे ज्यांच्याशी ते असं वागतात ही त्यांचीच भावकी आणि बारा बलुतेदारांपैकी एक आहेत… ही चिडचिड खूप काही सांगून जाते. पण आजच्या लढाईत स्वाभिमानी कार्यकर्ता आणि मतदार कोणत्याही धमक्यांना आणि दपडशाहीला भीक घालणार नाही!"

Web Title: Complaint from Supriya Sule to Election Commission against Datta Bharane after he threats voters, Baramati Lok Sabha Election 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.