‘गायतोंडे’ ग्रंथातून वाङ्मयचौर्य केल्याची तक्रार
By admin | Published: September 20, 2016 04:52 AM2016-09-20T04:52:34+5:302016-09-20T04:52:34+5:30
जेसल ठक्कर यांनी दुसऱ्या ग्रंथात वापरल्याची तक्रार ठाण्यातील लेखक, चित्रकार सतीश नाईक यांनी नारपोली पोलीस ठाण्यात दाखल केली
ठाणे : आपण प्रकाशित केलेल्या ‘गायतोंडे’ ग्रंथातील फोटोंसह मुखपृष्ठावरील फोटो आणि काही मजकूर प्रकाशिका जेसल ठक्कर यांनी दुसऱ्या ग्रंथात वापरल्याची तक्रार ठाण्यातील लेखक, चित्रकार सतीश नाईक यांनी नारपोली पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. ठक्कर यांच्यासह इतर पाच जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
नाईक यांनी चित्रकार गायतोंडे यांच्यावर आधारित ‘गायतोंडे’ हा ग्रंथ ३० जानेवारी २०१६ रोजी प्रकाशित केला. याच ग्रंथातील सुमारे ४५ फोटो, २७ परिच्छेद आणि दोन मुखपृष्ठांवरील फोटो ठक्कर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वत:च्या सोनाटा आॅफ सॉलिट्युड : वासुदेव संतू गायतोंडे (२ङ्मल्लं३ं ङ्मा २ङ्म’्र३४ीि : ५ं२४ीिङ्म २ंल्ल३४ ँ्र३ङ्मल्लीि) या इंग्रजी पुस्तकात वापरल्याचे नाईक यांच्या निदर्शनास आले. हा प्रकार म्हणजे उचलेगिरी असून तो गंभीर आहे. मी गायतोंडे यांच्या जीवनावर अभ्यास करून, अतिशय मेहनतीने त्यांची माहिती विविध क्षेत्रांतील लोकांकडून गोळा केली आहे. हा मजकूर ज्या पुस्तकात वापरला आहे, त्या पुस्तकाच्या प्रकाशिका ठक्कर यांच्यासह सहप्रकाशक प्रख्यात हिंदी लेखक अशोक बाजपेयी, लेखिका मीरा मेनंझीस, संपादक जेरी पिंटो आणि रझा फाउंडेशन यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. (प्रतिनिधी)