‘कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन’, उद्धव ठाकरेंविरोधात मुंबईत पोलिसांत तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 10:40 PM2022-06-22T22:40:23+5:302022-06-22T22:40:42+5:30

राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण झालेली असताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती.

Complaint lodged against Uddhav Thackeray in Mumbai violating coronavirus covid protocol maharashtra political crisis | ‘कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन’, उद्धव ठाकरेंविरोधात मुंबईत पोलिसांत तक्रार

‘कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन’, उद्धव ठाकरेंविरोधात मुंबईत पोलिसांत तक्रार

Next

राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण झालेली असताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधला होता. तसंच त्यांनी काही जणांची भेटही घेतली होती. आपलं वर्षा हे निवासस्थान सोडण्यापूर्वीही त्यांनी कार्यकर्त्यांची भेट घेतली होती. दरम्यान, यावरून भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय सचिव तेजिंदर पाल सिंह बग्गा यांनी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचं म्हणत तेजिंदर पाल यांनी पोलिसांत तक्रार केली. त्यांनी ऑनलाइन पद्धतीनं मलबार हिल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांनी खुद्द आपल्या ट्विटर अकाऊंटवरून यासंदर्भातील माहिती दिली आहे.


काय म्हटलंय तक्रारीत?
उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या मार्गदर्शक सूचनांचं उल्लंघन केलं आहे. अनेक माध्यमांमध्ये सकाळपासून उद्धव ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्याचं सांगण्यात येत होतं. तसंच कमलनाथ यांनीदेखील याला दुजोरा दिला होता. कोरोनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोरोनाच्या रुग्णाला कोणालाही भेटण्याची परवानगी नाही, तसंच त्यानं आयसोलेशनमध्ये राहणं आवश्यक आहे. पण माध्यमांमध्ये दिसत असलेल्या दृष्यांमधून उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या मार्गदर्शक सूचनांचं उल्लंघन केलं आणि त्यांनी समर्थकांची भेटही घेतली. मी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याची विनंती करत आहे, असं तेजिंदर सिंग यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.

Web Title: Complaint lodged against Uddhav Thackeray in Mumbai violating coronavirus covid protocol maharashtra political crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.