रेल्वे पोलिसांच्या हेल्पलाइनवर तक्रारींचा पाऊस

By admin | Published: June 6, 2016 02:40 AM2016-06-06T02:40:26+5:302016-06-06T02:40:26+5:30

रेल्वे पोलिसांच्या (जीआरपी) हेल्पलाइनवर मे महिन्यात तक्रारींचा पाऊस पडला आहे. प्रवाशांच्या मदतीसाठी असलेल्या हेल्पलाइनवर जवळपास १ हजार ३८२ कॉल आल्याची माहिती रेल्वे पोलिसांकडून देण्यात आली

Complaints of railway police helpline | रेल्वे पोलिसांच्या हेल्पलाइनवर तक्रारींचा पाऊस

रेल्वे पोलिसांच्या हेल्पलाइनवर तक्रारींचा पाऊस

Next

मुंबई : रेल्वे पोलिसांच्या (जीआरपी) हेल्पलाइनवर मे महिन्यात तक्रारींचा पाऊस पडला आहे. प्रवाशांच्या मदतीसाठी असलेल्या हेल्पलाइनवर जवळपास १ हजार ३८२ कॉल आल्याची माहिती रेल्वे पोलिसांकडून देण्यात आली. यामध्ये सर्वाधिक कॉल हरविलेल्या बॅगांबाबत आहेत.
प्रवाशांच्या मदतीसाठी ९८३३३३११११ क्रमांकाची हेल्पलाइन उपलब्ध करण्यात आली आहे. या हेल्पलाइनवर विविध प्रकारचे कॉल येत असतात. आलेल्या कॉलनंतर हेल्पलाइनकडून संबंधित रेल्वे पोलीस स्टेशनला माहिती दिली जाते आणि त्यानंतर प्रवाशांना त्वरित मदत पुरविण्यात येते. मे महिन्यात आलेल्या कॉलमध्ये सर्वाधिक ९८९ कॉल हे हरविलेल्या बॅगांबाबत आहेत. हेल्पलाइनद्वारे दिलेल्या मदतीतून जवळपास २४१ बॅगा प्रवाशांना परत मिळाल्या आहेत. जवळपास १७ लाख ९१ हजार ५७२ रुपये किमतीचा ऐवज परत मिळवून देण्यात रेल्वे पोलिसांना यश आले आहे. त्यानंतर अपघातग्रस्तांसाठी मोठ्या प्रमाणात कॉल आले असून, त्यानंतर महिला डब्यात पुरुषांच्या घुसखोरीविरोधातही कॉल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. रेल्वेकडून संशयित बॅगा आणि इसमांबद्दल माहिती देण्याचे आवाहन उद्घोषणेद्वारे केले जाते. त्याला प्रतिसाद देत त्याची माहितीही हेल्पलाइनवर प्रवाशांनी दिली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Complaints of railway police helpline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.