तक्रारीने छळले, लग्नाने तारले

By admin | Published: October 18, 2014 01:41 AM2014-10-18T01:41:29+5:302014-10-18T01:41:29+5:30

प्रेमाच्या नावाखाली शारीरिक संबंध प्रस्थापित करून लगAास नकार देणा:या शिक्षकाविरुद्ध पीडित शिक्षिकेने अत्याचाराची तक्रार नोंदविली.

Complaints tortured, saved by marriage | तक्रारीने छळले, लग्नाने तारले

तक्रारीने छळले, लग्नाने तारले

Next
नागपूर : प्रेमाच्या नावाखाली शारीरिक संबंध प्रस्थापित करून लगAास नकार देणा:या शिक्षकाविरुद्ध पीडित शिक्षिकेने अत्याचाराची तक्रार नोंदविली. यानंतर फौजदारी कारवाईचा बडगा पाहून भानावर आलेल्या शिक्षकाने शिक्षिकेसोबत लगA केले. हे दोघेही एफआयआर रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आले होते. न्यायालयाने त्यांची विनंती मान्य केली. जीवनातील या घडामोडीमुळे तक्रारीने छळले, पण लगAाने तारले, असा अनुभव दोघांनाही आला.
या प्रकरणातील शिक्षक व शिक्षिका पवनी तालुक्यातील एका शाळेत कार्यरत आहेत. एकत्र कार्य करताना त्यांच्यात जवळीक निर्माण झाली. जवळीक प्रेमात बदलली. त्यांनी विवाह बंधनात अडकण्याच्या आणाभाका घेतल्या. यातूनच शारीरिक संबध आले. यानंतर काहीतरी बिनसले अन् शिक्षकाने विवाहास नकार दिला. भावी आयुष्याचे स्वप्न एका क्षणात भंगल्याने खचलेल्या शिक्षिकेने थेट पोलीस ठाणो गाठून अत्याचाराची तक्रार नोंदविली. यावरून पोलिसांनी शिक्षकाविरुद्ध गुन्हा नोंदविला होता. यानंतर सामोपचाराने वाद मिटवून 3क् सप्टेंबर रोजी दोघे विवाहबद्ध झाल़े (प्रतिनिधी)

 

Web Title: Complaints tortured, saved by marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.