प्रकल्पग्रस्तांना पूर्ण भरपाई

By admin | Published: December 24, 2016 03:56 AM2016-12-24T03:56:47+5:302016-12-24T03:56:47+5:30

कल्याण-डोंबिवली महापालिकेतील २७ गावांमधील रस्ता रुंदीकरणात बाधित होणाऱ्यांना पूर्ण नुकसानभरपाई देऊनच रस्ता रुंदीकरणाची

Complete compensation for project affected | प्रकल्पग्रस्तांना पूर्ण भरपाई

प्रकल्पग्रस्तांना पूर्ण भरपाई

Next

मुंबई : कल्याण-डोंबिवली महापालिकेतील २७ गावांमधील रस्ता रुंदीकरणात बाधित होणाऱ्यांना पूर्ण नुकसानभरपाई देऊनच रस्ता रुंदीकरणाची कामे केली जातील, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी दिली. तसेच, २७ गावांमध्ये पूर्ण दाबाने पाणी सोडण्याचे निर्देश पालकमंत्री शिंदे यांनी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना दिले असून, वाढीव पाणीपुरवठ्याबाबतचा निर्णय मंगळवारी आयोजित बैठकीत होणार आहे.
कल्याण-शीळ रस्त्याचा कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील टप्पा, चक्की नाका ते नेवाळी रस्ता तसेच मानपाडा रोड या तीन रस्त्यांच्या रुंदीकरणाचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. वाहतूक सुरळीत होण्यासाठी या रस्त्यांचे रुंदीकरण होणे आवश्यक आहे. परंतु, या रुंदीकरणात बाधित होणाऱ्या ग्रामस्थांचे काही आक्षेप होते. त्यासंदर्भात पालकमंत्री शिंदे यांच्या मंत्रालयातील दालनात शुक्रवारी बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार सुभाष भोईर, महापौर राजेंद्र देवळेकर, सभागृह नेते राजेश मोरे, आयुक्त ई रवींद्रन, २७ गावांमधील नगरसेवक, शहर अभियंता प्रमोद कुलकर्णी, एमआयडीसी तसेच एमएसआरडीसीचे अधिकारी उपस्थित होते.
कल्याण-डोंबिवली महापालिकेकडे बीएसयूपीची घरे असून, त्यात रस्तेबाधितांना स्थलांतरित करण्याचा पर्याय उपलब्ध असून, त्यासाठी राज्य शासनाकडून मंजुरी मिळवून देण्याची ग्वाही शिंदे यांनी या वेळी दिली. तसेच, महापालिका हद्दीत प्रकल्पग्रस्तांसाठी मोठ्या प्रमाणावर ट्रान्झिट कॅम्पची उभारणी करण्याचे निर्देशही त्यांनी आयुक्तांना दिले. मानपाडा रस्त्याच्या रुंदीकरणासाठी नव्याने सर्वेक्षण करून प्रकल्पबाधितांबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देशही शिंदे यांनी दिले असून, कमीतकमी बाधित होतील, अशा पद्धतीने रस्त्यांची आखणी करण्याच्या सूचनाही केल्या आहेत. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Complete compensation for project affected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.