मंंदोशी घाटात कठड्यांचे काम पूर्ण

By admin | Published: July 10, 2017 01:51 AM2017-07-10T01:51:04+5:302017-07-10T01:51:04+5:30

मंदोंशी घाटातील कठडे तुटल्यामुळे हा घाट वाहतुकीसाठी धोकादायक झाला होता.

Complete the work of quarries in Mandoshoshi Ghat | मंंदोशी घाटात कठड्यांचे काम पूर्ण

मंंदोशी घाटात कठड्यांचे काम पूर्ण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
डेहणे : मंदोंशी घाटातील कठडे तुटल्यामुळे हा घाट वाहतुकीसाठी धोकादायक झाला होता. याच कारणाने येथील पंढरपूर-पुणे-भीमाशंकर ही एसटी बस बंद करावी लागली होती. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे या घाटातील धोकादायक वळणावर कठडे बांधण्यात आले असून, हा घाट वाहतुकीसाठी पुन्हा सुरू करण्याचे प्रमाणपत्र सार्वजनिक बांधकाम विभागाने दिले आहे.
पुणे, चाकणमार्गे येणाऱ्या प्रवाशांना भीमाशंकरला जाण्यासाठी मंचरमार्गाने २५ ते ३० कि.मी. जास्तीचा प्रवास करावा लागतो. हा प्रवास राजगुरुनगरवरुन वाडा-डेहणे या मधल्या मार्गाने केल्यास २५-३० कि.मी.चा प्रवास व वेळ
वाचतो. शिवाय या मार्गावरील ४० कि.मी.चा चासकमान धरणाशेजारून जाणारा रस्ता पर्यटकांना
आकर्षित करतो. पुढे भोरगड व अभयारण्याचा निसर्गरम्य परिसर म्हणजे पर्वणीच.
त्यामुळे पर्यटक या मार्गाचा अवलंब करत असतात. मात्र, मंदोशी घाटातील धोकादायक वळणावर कठडे नसल्यामुळे मधल्या काळात पंढरपूर-पुणे -भीमाशंकर ही एसटी बस बंद करण्यात आली.
ही बस आर्थिक फायद्याची ही ठरली परंतु सुरक्षिततेचे कारण देत बंद करण्यात आली. या नंतर या घाटाच्या दुरुस्तीची सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरुवात करण्यात
आली होती.
घाटातील अनेक धोकादायक वळणांवर कठडे बांधण्याचे काम हाती घेण्यात आले होते. हे काम आता पूर्ण झाले आहे.
पुणे विभागीय अधिकारी यांना २०१५मध्ये भीमाशंकर -राजगुरुनगर एसटी बस सुरू करण्याबाबत पत्रव्यवहार केला होता, त्यानंतर वाहतूक नियंत्रक, पुणे यांनी फेब्रुवारी २०१५ ला या नवीन फेरीस रीतसर मंजुरी दिली. परंतु या रस्त्याचे सर्वेक्षण केल्यावर मंदोशी घाटातील दुसऱ्या वळणावर कठडा बांधणे आवश्यक असल्याचा अहवाल दिल्याने बस सुरू होऊ शकली नाही. परंतु आता या सर्व त्रुटी पूर्ण झाल्यामुळे व घाटरस्ता पूर्ण सुरक्षित असल्याने श्रावण महिना सुरू होण्याआधी ही एसटी बस सुरू करण्याबाबत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पुणे विभागाकडे प्रवाशांच्या वतीने मागणी केली आहे.’’
- अ‍ॅड. सुरेश कौदरे,
सहकार्यकारी विश्वस्त,
श्री क्षेत्र भीमाशंकर संस्थान.
भीमाशंकरला जाणारा जवळचा मार्ग
भीमाशंकर येथे जाण्यासाठी राजगुरुनगरवरुन एकही एसटी बस नसल्यामुळे भीमाशंकरला चाकण, पुणे मार्गे येणाऱ्या भाविकांना मंचर मार्गे वळसा घालून प्रवास करावा लागत आहे. यामुळे नाहक वेळ व पैसा खर्च होत आहे. भीमाशंकरला येणाऱ्या भाविक व पर्यटकांची भोरगिरी, कोटेश्वरच्या निसर्गरम्य परिसराला पसंती असल्याने त्यांना या मार्गाने जाण्यासाठी एसटी नसल्यामुळे गैरसोय होत आहे. दिवसेंदिवस वाढत जाणारी गर्दी पाहता या मार्गे भीमाशंकर-राजगुरुनगर एसटी बस सुरू करण्याची मागणी भाविकांकडून करण्यात येत आहे.पावसाळ्यात येणारे पर्यटक व पुढे श्रावण महिन्यात भीमाशंकरला येणाऱ्या भाविकांच्या सोईसाठी भीमाशंकर- -राजगुरुनगर एसटी बस सुरू होणे आवश्यक आहे.
अनेक वेळा तोंडी मागणी केली जाते परंतु एसटीचे अधिकारी दुर्लक्ष करत असतात, त्यामुळे ‘लोकमत’च्या माध्यमातून अनेक भाविक व स्थानिक ग्रामस्थांनी ही बस त्वरित चालू करण्याची मागणी केली आहे.

Web Title: Complete the work of quarries in Mandoshoshi Ghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.