‘पावसाळ्यापूर्वी जलयुक्त शिवारची कामे पूर्ण करा’

By admin | Published: April 20, 2017 04:40 AM2017-04-20T04:40:43+5:302017-04-20T04:40:43+5:30

जलयुक्त शिवार योजनेची आणि शेततळ्यांची कामे येत्या दोन महिन्यांत मिशन मोडवर पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना दिले

'Complete the work of the submerged shire before the monsoon' | ‘पावसाळ्यापूर्वी जलयुक्त शिवारची कामे पूर्ण करा’

‘पावसाळ्यापूर्वी जलयुक्त शिवारची कामे पूर्ण करा’

Next

मुंबई : जलयुक्त शिवार योजनेची आणि शेततळ्यांची कामे येत्या दोन महिन्यांत मिशन मोडवर पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे, प्रधानमंत्री आवास योजना आदी योजनांचा सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. यावेळी मुख्य सचिव सुमित मल्लिक यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या वेळी मुख्यमंत्री म्हणाले की, यंदा पाऊस चांगला पडेल असे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. पावसाची पाणी साठविण्याची योग्य व्यवस्था असेल तरच या पावसाचा उपयोग होणार आहे. त्यासाठी त्यासाठी जलयुक्त शिवार व जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणावर पूर्ण होणे आवश्यक आहेत. आखलेली सर्व कामे पुढील दोन महिन्यांत पूर्ण करण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी जोमाने कामाला लागावे. गेल्या दोन वर्षांत ज्याप्रमाणे स्पर्धात्मक पद्धतीने या दोन्ही फ्लॅगशीप कार्यक्रमासाठी कामे केली तशीच यंदाही करावीत. यात कोणतीही दिरंगाई करू नये, असे बजावतानाच या योजनांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू देणार नाही अशी हमी मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
पुढील दोन महिन्यांच्या काळात शेती व शेतीपूरक कामांना प्राधान्य देण्यात यावे. मागेल त्याला शेततळे योजनेच्या माध्यमातून जलसंचय वाढविण्यासाठी शेतकऱ्यांचा सहभाग घ्यावा. जलयुक्त व शेततळे योजनेच्या मंजुरीची कामे पूर्ण करण्याची प्रक्रिया तातडीने करा. पुढील महिन्यात प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. (प्रतिनिधी)

Web Title: 'Complete the work of the submerged shire before the monsoon'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.