‘जनआरोग्य योजना व्यापक स्वरूपात राबविणार’
By admin | Published: May 2, 2017 04:41 AM2017-05-02T04:41:15+5:302017-05-02T04:41:15+5:30
महात्मा फुले जनआरोग्य योजना नव्या व अधिक व्यापक स्वरूपात सुरू करण्यात येणार आहे. नंदुरबारला पुढील
नंदुरबार : महात्मा फुले जनआरोग्य योजना नव्या व अधिक व्यापक स्वरूपात सुरू करण्यात येणार आहे. नंदुरबारला पुढील वर्षापासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी प्रयत्न राहणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केली.
नंदुरबारला रविवारी महाआरोग्य शिबिरात एक लाख रुग्णांची तपासणी केल्याचा दावा संयोजकांनी केला. तब्बल दोन लाख २०
हजार रुग्णांची नोंदणी झाली असून २ मेपर्यंत त्यांची तपासणी करण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांनी या शिबिरास भेट दिली. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, वैद्यकीय शिक्षण व जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री जयकुमार रावल आदी उपस्थित
होते. मुख्यमंत्री म्हणाले, ‘सर्वांसाठी आरोग्य’ ही राज्य सरकारची संकल्पना आहे. त्यामुळे महात्मा फुले जनआरोग्य योजनेत कुणीही वैद्यकीय उपचारांअभावी वंचित राहू नये, यासाठी शासनाचे प्रयत्न आहेत. (प्रतिनिधी)