प.रे.च्या अधिकाऱ्याला सक्तीची रजा
By admin | Published: June 11, 2016 02:12 AM2016-06-11T02:12:50+5:302016-06-11T02:12:50+5:30
भार्इंदर येथील एसी स्वच्छतागृहाच्या उद्घाटनाला स्थानिक खासदारांना न बोलावल्याने महिला अधिकाऱ्यास सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले
मुंबई : पश्चिम रेल्वेच्या भार्इंदर येथील एसी स्वच्छतागृहाच्या उद्घाटनाला स्थानिक खासदारांना न बोलावल्याने महिला अधिकाऱ्यास सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे.
भार्इंदर येथे बांधण्यात आलेल्या एसी स्वच्छतागृहाचे अलीकडेच उद्घाटन करण्यात आले. मात्र ठाण्यातील खासदारांना या उद्घाटन कार्यक्रमासाठी बोलाविण्यात आले नाही. लोकप्रतिनिधींच्या एका कार्यकर्त्याने यासंदर्भात संबंधित रेल्वे अधिकाऱ्याशी संपर्क साधला व संभाषण रेकॉर्ड केले. या संभाषणात रेल्वेने स्वच्छतागृह बांधले आहे आणि त्याच्या उद्घाटन कार्यक्रमास लोकप्रतिनिधींना बोलावले नाही त्याबाबतची तक्रार तुम्ही त्यांच्याकडे करा, असे महिला अधिकाऱ्याने सांगितले. या संभाषणाचे रेकॉर्डिंग आणि तक्रार रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे करण्यात आली. त्यानंतर प्रभू यांनी चौकशीचे आदेश दिले आणि त्याची चौकशी करताच पश्चिम रेल्वे महाव्यवस्थापक जी.सी. अग्रवाल
यांनी सक्तीच्या रजेवर पाठविले. (प्रतिनिधी)