महिनाभरात सातबारा होणार संगणकीकृत

By Admin | Published: April 7, 2017 05:56 AM2017-04-07T05:56:33+5:302017-04-07T05:56:33+5:30

महिनाभरात राज्यातील सर्व सातबारांच्या संगणकीकरणाचे काम पूर्ण करण्यात येईल

Computerization will be done in seven months | महिनाभरात सातबारा होणार संगणकीकृत

महिनाभरात सातबारा होणार संगणकीकृत

googlenewsNext

मुंबई : महिनाभरात राज्यातील सर्व सातबारांच्या संगणकीकरणाचे काम पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत दिली. सातबारांचे संगणीकरण झाल्यानंतर व्यवहारातील गैरप्रकारांना आळा बसेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
महसूल अधिका-यांशी संगनमत करुन बोरीवली येथील सर्व्हे क्रमांक २०९ मधील तब्बल १४ एकरचा भूखंड हडपण्यात आल्याचा मुद्दा शिवसेना सदस्य अनिल परब यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे उपस्थित केला. अधिका-यांशी संगनमत करुन तब्बल ८० वर्षे ज्याने शेती कसली त्याला भूमीहीन करण्यात आले. शिवाय, झोपडपट्टी पुर्नवसन योजनेत मोठ्या प्रमाणावर झोपडीधारकांची फसवणूक केली जात आहे, अशा सर्व गैरप्रकारांकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप परब यांनी यावेळी केला. यावेळी झालेल्या चर्चेला उत्तर देताना महसूल मंत्री पाटील म्हणाले की, बोरीवली येथील समस्या ही खोतीसंदर्भातील आहे. या प्रकरणात मूळ मालकांचे नाव सातबा-यावर आणावे, यासाठी ९ मार्च २०१७ रोजी बोरीवलीच्या तहसीलदारांकडे तक्रार दाखल आहे. विषय खूप गुंतागुंतीचा असल्याने सभापतींच्या दालनात बैठक घेऊ, असे आश्वासन चंद्रकांत पाटील यांनी दिले. (प्रतिनिधी)
>सफाई कामगारांना हक्काची घरे देणार
सफाई कामगारांच्या वसाहतींचा प्रश्न सोडवण्यासाठी महानगरपालिकेतर्पेष्ठ आश्रय योजना व सरकारतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजना सुरू करण्यात आली आहे. सफाई कर्मचा-यांच्या वसाहतींचा पुनर्विकास करून सेवा कालावधीत सदनिका उपलब्ध करून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, अशी माहिती नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी दिली.

Web Title: Computerization will be done in seven months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.