संगणकीकृत सातबारा दुरुस्ती युद्धपातळीवर

By admin | Published: June 13, 2016 01:36 AM2016-06-13T01:36:06+5:302016-06-13T01:36:06+5:30

खेड तालुक्यातील संगणकीकृत सातबारा रेकॉर्डमधील चुका सुधारण्यासाठी राजगुरुनगर येथे युद्धपातळीवर काम सुरू

Computerized Seventh Amendment | संगणकीकृत सातबारा दुरुस्ती युद्धपातळीवर

संगणकीकृत सातबारा दुरुस्ती युद्धपातळीवर

Next


राजगुरुनगर : खेड तालुक्यातील संगणकीकृत सातबारा रेकॉर्डमधील चुका सुधारण्यासाठी राजगुरुनगर येथे युद्धपातळीवर काम सुरू असून, तालुक्यातील सर्व गावांचे तलाठी आणि मंडलाधिकारी त्यासाठी येथे तळ ठोकून आहेत.
खेड तालुक्यात १८९ महसुली गावे आहेत. त्यांसाठी एकूण ५५ तलाठी सज्जे आणि ९ मंडल आहेत. तालुक्यात दीड लाखावर सातबारा उतारे आहेत. शासनाने सर्व महसुली रेकॉर्ड इंटरनेटवर घेऊन सातबारा आॅनलाइन देण्याचे धोरण निश्चित केले आहे. त्यानुसार खेड तालुक्यात आॅनलाइन सातबारा २३ आॅक्टोबर २०१५ पासून देण्यात येईल, असे घोषित करण्यात आले होते. सर्व सातबारा आॅनलाइन करण्याचे काम पूर्ण झाले नसतानाच ही घोषणा करण्यात आली. अनेक त्रुटी असल्याने चुकांचे प्रमाण वाढतच होते. त्यामुळे नागरिकांना सातबारा वेळेवर मिळत नव्हते. यातून नागरिक आणि तलाठी-मंडलाधिकारी असा संघर्ष होत होता.
शेवटी शासनाने संगणकावरील रखडलेल्या नोंदी पूर्ण करण्यासाठी आणि हस्तलिखित सातबारावरील सर्व प्रकारच्या नोंदी इंटरनेटवर अपलोड करण्यासाठी ३० जूनपर्यंत कर्मचाऱ्यांना मुदत दिली आहे. म्हणून या दुरुस्त्या आणि नोंदी पूर्ण करण्यासाठी खेड तालुक्यातील ४५ तलाठी आणि ९ मंडलाधिकारी राजगुरुनगर येथील नगरपरिषदेच्या सभागृहात काम करीत आहेत. त्यासाठी खेडचे तहसीलदार सुनील जोशी यांनी इंटरनेट, वायफाय, बटरी बॅकअप उपलब्ध करून दिला आहे.
‘एडिट मॉडेल प्रणाली’ या प्रणालीच्या आधारे सातबारे दुरुस्त करून इंटरनेटवर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. जुलै महिन्यापासून साताबारचे उतारे संगणकावर सर्व दुरुस्त्या आणि बदलासह प्राप्त होतील. तहसीलदार सुनील जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरू असून, स्मिता कुलकर्णी, तालुका डाटा आॅपरेटर संकेत तनपुरे, मंडलाधिकारी अशोक सुतार, डी. एन. खोमणे, डी. पी. उगले, एच. ए. सोनवणे आदी नियंत्रण करीत आहेत. (वार्ताहर)
सातबारे आॅनलाइन करण्याबाबत शासन ठाम आहे.
थोडा त्रास झाला, तरी पुढे लोकांना ते फार सोयीचे होणार आहे. खरेदीखत, गहाणखत, बँकांची कर्ज प्रकरणे
इत्यादी कामांसाठी लोकांना सातबारा लागतात.
मात्र हस्तलिखित सातबारा आणि संगणकीय
सातबारा यात तफावती आढळत असल्याने या
कामांमध्ये अडचणी येत होत्या. तलाठी संघटनेने शासनाला या अडचणी सांगितल्या. म्हणून
मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून ‘एडिट मॉडेल प्रणाली’
उपलब्ध करून दिली आणि आता तीद्वारे महसूल रेकॉर्ड अद्ययावत करण्यात येणार आहे, असे तहसीलदार जोशी यांनी सांगितले.

Web Title: Computerized Seventh Amendment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.