नवदुर्गा उत्सवातून स्त्री सक्षमीकरणाचा पायंडा
By admin | Published: October 10, 2016 12:05 PM2016-10-10T12:05:56+5:302016-10-10T12:07:58+5:30
२८ वर्षांपासून प्रबोधनाचा वारसा जोपासणा-या सोनू क्रीडा मंडळाने यावर्षी महिलांवर होणारे अत्याचार व मुलींची कमी होणारी संख्या यावर प्रकाश टाकला आ
Next
>रलीधर चव्हाण, ऑनलाइन लोकमत
मोताळा (बुलडाणा), दि. १० - २८ वर्षांपासून प्रबोधनाचा वारसा जोपासणा-या सोनू क्रीडा मंडळाने यावर्षी महिलांवर होणारे अत्याचार व मुलींची कमी होणारी संख्या यावर प्रकाश टाकला आहे. बेटी बचाओ बेटी पढाओचा संदेश देत स्त्री सक्षमीकरणाचा पायंडा या मंडळाने पाडला असून, प्रबोधनाची परंपरा यावर्षीही कायम ठेवली आहे. देवीच्या दर्शनासाठी येणाºया हजारो भाविकांना यापासून प्रेरणा मिळत आहे.
शहरातील जुना गाव परिसरात काही तरूणांनी २८ वर्षापूर्वी एकत्र येत जय दुर्गा उत्सव मंडळाची स्थापना केली होती. त्यावेळी मनोरंजनाची साधने कमी असल्यामुळे दुर्गोत्सवाच्या माध्यमातून विविध धार्मिक कार्यक्रम मंडळाच्या कार्यकारिणी सदस्यांच्यावतीने आयोजित करण्यात येत होते. तीच परंपरा येणाºया दुर्गोत्सव मंडळाच्या कार्यकारिणी सदस्यांनी
कायम ठेवली. त्यामुळे जय दुर्गा उत्सव मंडळाचा उत्सव मोताळा परिसरातील नागरिकांसाठी पर्वणी असतो. यावर्षीही मंडळाने मुलींची कमी होणारी संख्या ह्या राष्ट्रीय समस्येला देखाव्यातून वाचा फोडली आहे. संपूर्ण मंडळ परिसरात विविध प्रकारचे लेक शिकवा, लेक जगवा, बेटी बचाओ बेटी पढाओ याविषयी व्यापक सामाजिक जनजागृती करण्यासाठी डीजिटल बॅनर लावले
आहेत. या जनजागृतीतून दर्शनासाठी येणाºया प्रत्येक भाविकांपर्यंत हा संदेश जात आहे. शिवाय दुर्गोत्सवाच्या माध्यमातून परिसरातील लहान-मोठयांना एकत्र आणून विविध स्पर्धेत सहभागी करूण घेणे, भजन कीर्तनाचे कार्यक्रम आयोजित करून सर्वाना आनंदात सहभागी करून घेणे असा कार्यक्रम नऊ दिवस चालतो. मंडळात नवीन सदस्य आले मात्र; विविध कार्यक्रमाचे आयोजन करून सर्वाना एकत्रा आणण्याचा प्रयत्न जय दुर्गा उत्सव मंडळ करीत आहे. शुक्रवारी निराधार वृद्ध महिलांना मान्यवरांच्या हस्ते लुगडे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. यावर्षी स्थापन करण्यात आलेल्या दुर्गोत्सव मंडळाचे अध्यक्ष रमा कानडे, उपाध्यक्ष निलेश किरोचे, कोषाध्यक्ष गजानन चित्रंग, सदस्य निखील जैस्वाल, भुषण वानखेडे, विशाल झाल्टे, वरूण असोलकर, नितीन इंगळे, अक्षय क्षिरसागर आदी सदस्य आहेत. यावर्षीही विविध स्पर्धा व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, प्रोत्साहनपर बक्षीस ठेवण्यात आले आहे.