मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी केल्या 'या' घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2017 03:57 PM2017-08-09T15:57:24+5:302017-08-09T18:03:14+5:30
मराठा समाजासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत महत्वाची आश्वासने दिली.
मुंबई, दि. 8 - मुंबईत निघालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत निवेदन सादर केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाच्या मागण्यांसदर्भात महत्वपूर्ण घोषणा केल्या.
- मराठा समाजातील विद्यार्थ्यांना 605 अभ्यासक्रमांमध्ये सवलती मिळणार.
- शिष्यवृत्तीसाठी 60 टक्क्यांची अट काढून 50 टक्के करण्यात आली आहे.
- ओबीसी विद्यार्थ्यांना जितक्या सवलती मिळतात तितक्याच सवलती मराठा समाजातील विद्यार्थ्यांना मिळणार आहेत.
- अण्णासाहेब पाटील महामंडळांकडून शेतकरी कुटुंबातील तीन लाख तरूण-तरुणींना कौशल्य प्रशिक्षण देण्यात येईल, तसेच बँकांकडून दहा लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करुन दिल्यानंतर त्याचे व्याज महामंडळामार्फत भरण्यात येईल.
- मराठा विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह बांधणार त्याच्या बांधकामासाठी 5 कोटी रुपये देण्यात येतील.
- सरकारी नोक-यांमध्ये आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार अनुकूल असून, सध्या हे प्रकरण मागासवर्गीय आयोगाकडे आहे.
- कोपर्डी खटल्याची सुनावणी अंतिम टप्प्यात आहे.
- तीन लाख मुलांना कौशल्य प्रशिक्षण देणार.
- मंत्रिमंडळाची उपसमिती तयार करण्यात येईल, ही समिती मराठा संघटनांबरोबर दर दोन ते तीन महिन्यांनी चर्चा करुन समस्या सोडवण्याचा प्रयत्न करेल.