करणची 'मुश्किल' दूर, मनसेची 'सशर्त' माघार
By Admin | Published: October 22, 2016 11:47 AM2016-10-22T11:47:33+5:302016-10-22T15:47:49+5:30
करण जोहर दिग्दर्शित 'ए दिल है मुश्किल' या चित्रपटाचा प्रदर्शनाचा अखेर मार्ग मोकळा झाला असून राज ठाकरेंच्या मनसेने चित्रपट प्रदर्शनला ' सशर्त' परवानगी दिली आहे.
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २२ - गेल्या अनेक दिवसांपासून वादात सापडलेला करण जोहर दिग्दर्शित ' ए दिल है मुश्किल' या चित्रपटाचा प्रदर्शनाचा अखेर मार्ग मोकळा झाला आहे. मनसेने काही अटींवर चित्रपटाच्या प्रदर्शनाला असलेला विरोध मागे घेतला आहे.
यापुढे कोणत्याही पाकिस्तानी कलाकार, गायक, तंत्रज्ञ यांना बॉलिवूडमध्ये प्रवेश मिळणार नाही हे लिहून द्या अशी अट आपण दिग्दर्शक- निर्मात्यांपुढे ठेवली व त्यांनी ती मान्य केली आहे असे राज यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
- जे निर्माते पाकिस्तानी कलावंतांना घेऊन चित्रपट बनवत आहेत त्यांनी प्रायश्चित म्हणून प्रत्येकी पाच कोटी रुपये आर्मी वेलफेअर फंडासाठी मनोहर पर्रिकर यांच्याकडे जमा करावेत अशी आपली मागणी आहे असे राज यांनी सांगितले.
- मनसेने यापूर्वीही पाक कलाकारांना विरोध दर्शवला आहे, त्यामुळे हा मनसेच्या आंदोलनाचाच विजय असल्याचा दावा करत 'ए दिल' चित्रपट कोणी पाहील असं मलातरी वाटत नाही, असे राज यांनी सांगितले. आतापर्यंत पाकिस्तानने आपले चॅनेल्स आणि चित्रपट कसे बॅन केले, आपल्या कलाकांरांच्या कार्यक्रमाला कसा विरोध दर्शवला, हे आपण पाहिलंच आहे मग त्यांच्यासाठी रेड कार्पेट का अंथरता ? असा सवाल राज यांनी विचारला.