परिषद घेणार अ.भा. बालनाट्य संमेलन
By admin | Published: February 9, 2015 05:06 AM2015-02-09T05:06:17+5:302015-02-09T05:06:17+5:30
बालरंगभूमी सक्षम व्हावी, बालकलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, यासाठी अखिल भारतीय बालनाट्य संमेलन घेण्याचा ठराव रविवारी नाट्य
प्रसन्न पाध्ये, बेळगाव (बाळासाहेब ठाकरे नाट्यनगरी)
बालरंगभूमी सक्षम व्हावी, बालकलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, यासाठी अखिल भारतीय बालनाट्य संमेलन घेण्याचा ठराव रविवारी नाट्य संमेलनाच्या खुल्या अधिवेशनात एकमताने मंजूर करण्यात आला. यासाठी राज्य शासनाकडे एक कोटी रुपयांची मागणीही करण्यात आली.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाची सभा रविवारी सकाळी गिरजे सभागृहात झाली. या सभेत एकूण चार ठराव करण्यात आले. त्या ठरावांना खुल्या अधिवेशनात मंजुरी देण्यात आली.
बालरंगभूमीविषयक जाणिवा प्रगल्भ व्हाव्यात, बालकांना संस्कारक्षम शिक्षण मिळावे हा या संमेलनाचा मागचा हेतू असल्याचे सांगण्यात आले. बालरंगभूमी सक्षम होण्याकरिता या नाट्य संमेलनाला महाराष्ट्र शासनाने एक कोटी रुपये द्यावेत, अशी मागणी ठरावाद्वारे करण्यात आली.
खुल्या अधिवेशनात मंजूर झालेल्या ठरावांची अंमलबजावणी होण्यासाठी ‘पाठपुरावा समिती’ संमेलनाध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करून प्रलंबित ठराव मार्गी लावावेत. तसेच ज्या रंगकर्मींना गेल्या वर्षात सन्मान प्राप्त झाले आहेत, त्यांचे अभिनंदन करण्याचा ठरावही संमत करण्यात आला. (प्रतिनिधी)