संघर्ष मुंबई कुणाल चषकाचा मानकरी

By admin | Published: February 16, 2015 10:08 PM2015-02-16T22:08:28+5:302015-02-16T23:11:06+5:30

कणकवली येथे राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा

Conflict of the Mumbai Kunal Cup Honors | संघर्ष मुंबई कुणाल चषकाचा मानकरी

संघर्ष मुंबई कुणाल चषकाचा मानकरी

Next

कणकवली : येथील विद्यामंदिर हायस्कूलच्या पटांगणावर आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत अटीतटीच्या अंतिम सामन्यात मुंबई उपनगर येथील संघर्ष संघाने विजय संपादन करीत कुणाल चषकावर आपले नाव कोरले. या स्पर्धेत मुंबई उपनगर येथील उत्कर्ष संघ उपविजेता ठरला. तर स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून संघर्षच्या योगेश सावंत याची निवड करण्यात आली. कुणाल बागवे कला-क्रीडा मंडळाच्यावतीने १२ फेब्रुवारीपासून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. १५ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजता मुंबई उपनगर येथील संघर्ष व उत्कर्ष संघामध्ये अंतिम सामना रंगला.
या राज्यस्तरीय स्पर्धेत उत्कृष्ट चढाईपटू म्हणून उत्कर्ष संघाच्या सुयोग राजा याची तर उत्कृष्ट पकडीसाठी संघर्ष संघाच्या नितीन मोरे याला गौरविण्यात आले. अंतिम सामन्यातील विजेत्यांना सुवर्णपदक तर उपविजेत्या संघातील खेळाडूंना रौप्य पदक देऊन गौरविण्यात आले. अंतिम सामना संघर्ष विरुद्ध उत्कर्ष मुंबई यांच्यात झाला. पहिल्या डावात संघर्ष संघाकडे असणारी दोन गुणांची आघाडी कायम ठेवत सरतेशेवटी संघर्ष संघाने १७-१५ अशा गुणांनी कुणाल चषकावर अखेर आपले नाव कोरले. हजारो क्रीडा रसिकांच्या उपस्थितीत या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ करण्यात आला. यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, सिने अभिनेत्री ऋजुता देशमुख, सिने दिग्दर्शक दीपक कदम, युवा नेते संदेश पारकर, मालवण उपनगराध्यक्ष राजन वराडकर, भाई सावंत, समृद्धी पारकर, रुपेश नार्वेकर, अवधूत मालणकर, कन्हैया पारकर, विशाल डामरी, परेश बागवे, योगेश तामाणेकर, महेंद्र मराठे, शशांक बोर्डवेकर, निनाद दीपनाईक, अमोल पेडणेकर, हरेश निखार्गे, गौरव हर्णे, महेश सावंत आदी उपस्थित होते.
सतीश सावंत, संदेश पारकर आदींनी मनोगत व्यक्त करताना स्पर्धा आयोजनाबाबत मंडळाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शामसुंदर सावंत यांनी केले. महाराष्ट्र राज्य कबड्डी फेडरेशनचे प्रभारी कार्यवाह संभाजी पाटील, थायलंड कबड्डी संघाचे प्रशिक्षक रमेश भेंडगिरी यांनी स्पर्धास्थळी भेट दिली. (वार्ताहर)


कोकणचे सौंदर्य अप्रतिम
निसर्गसंपन्न अशा कोकणात कबड्डीसारख्या खेळाची राज्यस्तरीय स्पर्धा सलग दहा वर्षे आयोजित करून कुणाल बागवे मित्रमंडळाने एक विक्रम रचला आहे. अशा शब्दांत सिने अभिनेत्री ऋजुता देशमुख यांनी मंडळाचे कौतुक करतानाच खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

कणकवली येथे कुणाल बागवे स्मृती राज्यस्तरीय स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या मुंबई उपनगर येथील संघर्ष संघाला सिनेअभिनेत्री ऋजुता देशमुख यांनी पारितोषिक देऊन गौरविले. यावेळी डावीकडून काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, संदेश पारकर, समृद्धी पारकर, राजन वराडकर, रुपेश नार्वेकर आदी उपस्थित होते.

Web Title: Conflict of the Mumbai Kunal Cup Honors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.