कोल्हापूरमध्ये उपसाबंदीवरून संघर्षाची चिन्हे

By admin | Published: April 18, 2016 01:29 AM2016-04-18T01:29:24+5:302016-04-18T01:29:24+5:30

पिण्याच्या पाण्यासाठी आता नदी, तलावांबरोबरच खासगी विहिरी, कूपनलिकांवरही (बोअरवेल) कोल्हापूर पाटबंधारे विभागाने उपासाबंदीचा आदेश काढला आहे. मात्र, त्यामुळे शेतकरी

Conflicts of struggle for coercion in Kolhapur | कोल्हापूरमध्ये उपसाबंदीवरून संघर्षाची चिन्हे

कोल्हापूरमध्ये उपसाबंदीवरून संघर्षाची चिन्हे

Next

- भीमगोंडा देसाई,  कोल्हापूर
पिण्याच्या पाण्यासाठी आता नदी, तलावांबरोबरच खासगी विहिरी, कूपनलिकांवरही (बोअरवेल) कोल्हापूर पाटबंधारे विभागाने उपासाबंदीचा आदेश काढला आहे. मात्र, त्यामुळे शेतकरी आणि प्रशासनात संघर्ष होण्याची चिन्हे आहेत.
स्वत:च्या पैशाने खोदलेल्या विहिरी आणि कूपनलिकांवर उपसाबंदी लादण्याचा प्रशासनास काय अधिकार आहे, असा
संतप्त सवाल शेतकऱ्यांनी केला
आहे. कोल्हापूर जिल्ह्यात
पाणीसाठे पिण्यासाठी पहिल्यांदा पिण्यासाठी आरक्षित करण्यात आले आहे.
उर्वरित पाणी शेती, उद्योगासाठी वापरण्याला मुभा दिली आहे. नोव्हेंबर २०१५ पासून नदी, तलाव यांच्यावर उपसाबंदी झाली.
उपसाबंदीच्या कालावधीत आकडे टाकून विद्युत पंपाद्वारे पाणी उपसणाऱ्या शेतकऱ्यांवर कडक कारवाई करा, अशी सूचना
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी
दोन दिवसांपूर्वी झालेल्या
पाणीटंचाई निवारण बैठकीत
दिली. त्यांच्या सूचनेचा आधार
घेत ‘पाटबंधारे’च्या प्रशासनाने खासगी कूपनलिका, विहिरी यांच्यावरही उपसाबंदी केली आहे.

सिंचनासाठी पाणी
चार मोठ्या प्रकल्पांतील २.२७ टीएमसी, नऊ मध्यम प्रकल्पातील ०.२०१ टीएमसी, ५३ लघु पाटबंधारे प्रकल्पातील २.२१२ टीएमसी पाणी सिंचनासाठी राखीव आहे.

काही शेतकरी उपसाबंदी नसलेल्या कालावधीत खासगी विहिरीत पाणी टाकत आहेत. उपसाबंदीच्या कालावधीत ते विहिरीतील पाणी उपसत असल्याच्या तक्रारी आहेत. उपसाबंदीची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी सरसकट खासगी विहिरी, कूपनलिका यांच्यावरही उपसाबंदी केली आहे.
- विजय पाटील, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग

सर्वच खासगी विहिरी, कूपनलिकांचे पाणी पिण्यास योग्य नसते. त्यामुळे विंधन विहिरी, विहिरी यांच्यावर उपसाबंदी करणे अन्यायकारक आहे. उपसाबंदीचा आठ दिवसांचा कालावधीही अधिक आहे. त्यामुळे भाजीपाल्यासारखी पिके करपून जात आहेत.
- भगवान काटे, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

Web Title: Conflicts of struggle for coercion in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.