फसवणूक झाल्याने गोंधळ
By Admin | Published: September 11, 2015 03:15 AM2015-09-11T03:15:58+5:302015-09-11T03:15:58+5:30
सुप्रसिद्ध पार्श्वगायिका उषा मंगेशकर यांना सांगीतिक मानवंदना देण्यासाठी गुरुवारी संध्याकाळी पीपल्स आर्ट सेंटर या संस्थेतर्फे षण्मुखानंद सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
- महेश चेमटे, मुंबई
सुप्रसिद्ध पार्श्वगायिका उषा मंगेशकर यांना सांगीतिक मानवंदना देण्यासाठी गुरुवारी संध्याकाळी पीपल्स आर्ट सेंटर या संस्थेतर्फे षण्मुखानंद सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते उषा मंगेशकर यांचा सत्कार करण्यात येणार होता. कार्यक्रमासाठी प्रेक्षकांकडून ५०० रुपये ते १५०० रुपयांपर्यंत तिकीट आकारण्यात आले. पण आयोजकांनी ऐनवेळी कार्यक्रम रद्द करून प्रेक्षकांच्या पैशांसह पळ काढल्याचा आरोप प्रेक्षकांनी केला.
प्रेक्षकांनी तिकिटाचे पैसे परत मिळवण्यासाठी गोंधळ घातल्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले होते. प्रेक्षकांच्या तक्रारीनंतर सायन पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.
या कार्यक्रमाला सुदेश भोसले, स्वप्निल बांदोडकर, वैशाली सामंत, आदर्श शिंदे, बेला शेंडे आदी कलाकार उपस्थित राहणार होते. कलाकारांचे सादरीकरण आणि उषा मंगेशकर यांचा सत्कार असल्याने या कार्यक्रमाची तिकिटे हातोहात विकली गेली होती. या प्रकरणी पीपल्स आर्ट सेंटर या संस्थेशी संपर्क होऊ शकला नाही.
नेमके काय घडले?
साडेसात वाजूनही कार्यक्रम सुरू न झाल्याने प्रेक्षकांची चलबिचल
सुरू झाली. या कार्यक्रमासाठी आलेले प्रेक्षक संजय कोलाप्ते यांनी
तिकीट विक्री केंद्रावर विचारणा केली. तेव्हा आयोजक येथे नसल्याचे त्यांना सांगण्यात आले.