मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने संभ्रम

By admin | Published: October 31, 2016 05:35 AM2016-10-31T05:35:23+5:302016-10-31T06:55:18+5:30

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली

Confusion by Chief Minister's statement | मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने संभ्रम

मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने संभ्रम

Next


मुंबई : बहुचर्चित शीना बोरा हत्येप्रकरणी तपासात मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. हत्येच्या तपासामध्ये तत्कालिन पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी अधिक स्वारस्थ दाखविल्याने त्यांची आयुक्तपदावरुन पदोन्नतीवर उचलबांगडी केल्याचे अप्रत्यक्षपणे स्पष्ट केले असले तरी, मारिया यांच्या बदलीनंतरही हत्येचा तपास त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु राहणार असल्याचे राज्य सरकारने त्यावेळी का जाहीर केले होते? त्यामागील नेमके कारण काय? अशी चर्चा पोलीस वर्तुळात सुरु आहे.
सरकारची त्यावेळेच्या व आत्ताच्या भूमिकेतील बदलामागील नेमके कारण काय, राजकीय सोयीनुसार त्यांच्याकडून बदल केला जात आहे, त्याचा फटका अधिकाऱ्यांच्या मनोबलावर होत असल्याची प्रतिक्रिया अधिकाऱ्यांकडून वर्तविली जात आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी शनिवारी शीना बोरा हत्येच्या तपासाच्या अनुषंगाने बोलताना पत्रकारांशी बोलताना या हत्येमागे पीटर मुखर्जी याचा सहभाग नसल्याचे माहिती मुंबई पोलिसांनी त्यावेळी आपल्याला दिली होती, असे सांगितले. त्यांनी स्पष्टपणे कोणत्याही अधिकाऱ्याचे नाव घेतले नसलेतरी ते अप्रत्यक्षपणे मारिया यांना उद्देशून होते. पीटरला सूट दिल्याने त्यांची होमगार्डला उचलबांगडी केली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र ८ सप्टेंबर २०१५ रोजी मारिया यांना अकस्मितपणे बढती देताना त्यांच्या जागी अहमद जावेद यांची नियुक्ती केल्यानंतर गृहसचिव के. पी. बक्षी यांनी पत्रकारांशी बोलताना वेगळीच भूमिका मांडली होती. सणासुदीचे दिवस असल्याने त्यापूर्वी जावेद यांना पुरेसा अवधी मिळावा, यासाठी २२ दिवसाआधी मारिया यांचे प्रमोशन करण्यात आले आहे. मात्र शीना बोरा हत्येचा तपास यापुढेही त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सुरु राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. परंतु, नाराज झालेल्या मारिया यांनी त्याला नकार दिला. त्यानंतर तब्बल १२ दिवसांनी बोरा हत्येचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आला होता. पुढे याप्रकरणी पीटर मुखर्जीला अटक करण्यात आली. (प्रतिनिधी)
ही वस्तुस्थिती असताना मुख्यमंत्र्यांनी शनिवारी केलेल्या वक्तव्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये उलटसुलट चर्चा सुरु आहे. मारिया हे पीटरला पाठीशी घालित होते तर ‘होमगार्ड’मध्ये बदली केल्यानंतरही याप्रकरणाचा तपास त्यांच्या मार्गदर्शनाखालीच सुरु ठेवण्याची भूमिका तेव्हा राज्य सरकारने का घेतली होती, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. (प्रतिनिधी)
>डीजी पदासाठी डावलले
पोलीस महासंचालक सतीश माथूर यांच्यानंतर सध्या राज्यातील सर्वांत ज्येष्ठ आयपीएस अधिकारी असलेले राकेश मारिया गेल्या वर्षभरापासून तुलनेत कमी दर्जाच्या होमगार्डच्या महासमादेशकपदावर कार्यरत आहेत. ‘एसीबी’च्या डीजी पदासाठी ते पात्र असतानाही राज्य सरकारने त्यांना जाणीवपूर्वक डावलण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, सीबीआयने शीना बोरा हत्याकांड प्रकरणाच्या तपासाच्या अनुषंगाने गुरुवारी मारिया यांच्यासह सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) देवेन भारती, उपायुक्त सत्यनारायण चौधरी यांच्याकडे चौकशी केली होती.

Web Title: Confusion by Chief Minister's statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.