‘कॅशलेस’बाबतच्या अज्ञानामुळे गोंधळ

By Admin | Published: January 1, 2017 02:21 AM2017-01-01T02:21:41+5:302017-01-01T02:21:41+5:30

ग्रामीण भागातील डिजिटल सुविधा विचारात घेऊन, कॅशलेसचा निर्णय टप्प्याटप्प्याने राबवावा, अशी जिल्ह्यातील ग्रामीण जनतेची भावना आहे. कॅशलेस व्यवहार कसा करावा

Confusion due to ignorance about 'cashless' | ‘कॅशलेस’बाबतच्या अज्ञानामुळे गोंधळ

‘कॅशलेस’बाबतच्या अज्ञानामुळे गोंधळ

googlenewsNext

कोल्हापूर : ग्रामीण भागातील डिजिटल सुविधा विचारात घेऊन, कॅशलेसचा निर्णय टप्प्याटप्प्याने राबवावा, अशी जिल्ह्यातील ग्रामीण जनतेची भावना आहे. कॅशलेस व्यवहार कसा करावा, याबाबत सामान्य माणसाला ज्ञान नसल्याने गोंधळ निर्माण झाला आहे. यासाठी या प्रशिक्षणही मिळावे, अशीही अपेक्षा ग्रामीण भागात व्यक्त करण्यात येत आहे. जिल्हातील म्हारूळ या गावातील नागरिकांची प्रतिक्रियाही यापेक्षा वेगळी नाही. साक्षरतेचे प्रमाण कमी आणि सुविधांचा अभाव, यामुळे हे गाव पूर्णत: कॅशलेस करण्यात अडचणी येत आहेत.

गाव : म्हारूळ
तालुका : करवीर,
जिल्हा : कोल्हापूर.
जिल्ह्याच्या ठिकाणापासून अंतर : २० किलोमीटर.
बॅँका, पतसंस्थांची
संख्या : एकही नाही.
पोस्ट आॅफिस : नाही.
एटीएम केंद्र : नाही.
वाहतूक सुविधा :
एसटी व केएमटीबस
इंटरनेट सुविधा : ग्रामपंचायतीमध्ये
कनेक्टिव्हिटी :
अधूनमधून तुटते.

कॅशलेस व
डिजिटल व्यवहार : महाविद्यालयीन तरुण मोबाइलवरून किरकोळ प्रमाणात डिजिटल व्यवहार करतात.

दोन महिन्यांत कॅशलेस व डिजिटल व्यवहार वाढले का? : संस्थांनी कॅशलेसबाबत पुढाकार घेतला, पण सुविधा नसल्याने अडचणी येत आहेत.

वीजपुरवठा : घरगुती वीजपुरवठा अखंडित.

350
स्मार्ट फोनधारक

65.5%
साक्षरतेचे प्रमाण

भारत डिजिटलदृष्ट्या साक्षर व्हायलाच हवा, यासाठी आमचा तरुणांचा प्रयत्न आहे. सध्या आम्ही मोबाइलच्या माध्यमातून याची थोडी सुरुवात केली आहे, पण संपूर्ण कॅशलेस व्यवहार होण्यासाठी प्रशिक्षणाची गरज आहे.
- अभिजित पाटील

चलन तुटवड्यामुळे शेतकऱ्यांबरोबर संस्थांची कोंडी झाली आहे. खताच्या दुकानात गेलो तर उधारी मिळत नाही. कॅशलेस व्यवहार करावा, पण तशा सुविधा व प्रशिक्षण देणे गरजेचे आहे.
- पांडुरंग चौगले, उपाध्यक्ष, भैरवनाथ विकास संस्था.

कॅशलेसच्या व्यवहाराबाबत आम्हाला भीती वाटते. त्याचबरोबर भविष्यात याचा मोबदला द्यावा लागला, तर तो परवडणारा नाही. याबाबत खात्री देऊन तशा सुविधा द्याव्यात.
- भरत चौगले, शेतकरी

चलन तुटवड्यामुळे व्यवसाय निम्म्यावर आला आहे. लोकांकडे पैसेच नसतील, तर ते आमच्या दुकानात कशाला येणार? कॅशलेस करण्यास हरकत नाही, पण याबाबत सुविधा व प्रशिक्षण देण्याआधीच निर्णय घेतल्याने त्रास होत आहे. - मनोेहर भाट, हॉटेल व्यावसायिक

किरकोळ व्यावसायिकांची मोठी कुचंबणा सुरू आहे. एक रुपयापासून शंभर रुपयांपर्यंत आमच्याकडे ग्राहक येतात. पारदर्शक व्यवहारासाठी कॅशलेस गरजेचे आहे, पण याबाबत कोणतेही प्रशिक्षण न देता एकदम नाक दाबणे योग्य नाही.
- बाजीराव पोवार, किराणा माल व्यावसायिक

Web Title: Confusion due to ignorance about 'cashless'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.