बीडीडीत बायोमेट्रिक सर्वेक्षणावेळी गोंधळ
By admin | Published: May 18, 2017 12:15 AM2017-05-18T00:15:49+5:302017-05-18T00:15:49+5:30
राज्य सरकारने बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा विडा उचलला असला, तरीदेखील बीडीडी चाळीतील रहिवाशांनी बायोमेट्रिक सर्वेक्षणाला विरोध केला आहे. बुधवारी सकाळी ना. म. जोशी
- लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्य सरकारने बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा विडा उचलला असला, तरीदेखील बीडीडी चाळीतील रहिवाशांनी बायोमेट्रिक सर्वेक्षणाला विरोध केला आहे. बुधवारी सकाळी ना. म. जोशी मार्गावर उपजिल्हाधिकारी कार्यालयाकडून सर्वेक्षण सुरू करण्यात आले असता, सर्वेक्षणात काही त्रुटी असल्याचे म्हणत रहिवाशांनी सर्वेक्षणाला विरोध केला.
बुधवारी सकाळी ना. म. जोशी मार्गावरील बाडीडी चाळीचे सर्वेक्षण करण्यासाठी उपजिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकारी दाखल झाले. मात्र, सर्वेक्षण सुरू असताना, रहिवाशांनी हरकती नोंदविल्या. घराची भाडेपावती, सरकारी अर्ज या दोन मुद्द्यांवरून रहिवाशांनी अधिकारी वर्गाला घेरले.
शिवाय, सर्वेक्षणाला विरोध नाही. मात्र, भाडेपावती आणि सरकारी अर्जातील गोंधळ मिटवून सर्वेक्षण सुरू करण्यात यावे. पुनर्विकास करताना संक्रमण शिबिरासह उर्वरित मुद्दे तडीस लावावे, असे मत व्यक्त केले.
काही रहिवाशांनी सर्वेक्षणाला सकारात्मक प्रतिसाद दिला. हा गोंधळ कमी करण्यासाठी आवश्यक उपाय योजले जातील, असे आश्वासन सर्वेक्षणकर्त्यांकडून रहिवाशांना देण्यात आले आहे.
नायगाव बीडीडी चाळीतील रहिवाश्यांनी याला विरोध केला आहे़
बीडीडी चाळ भाडेकरू हक्क संरक्षण परिषदेने मांडलेले मुद्दे...
- बायोमेट्रिक सर्वेक्षणाआधी बीडीडी पुनर्बांधणी प्रस्ताव ए टू झेड जाहीर करा
- रीतसर व सविस्तर करारनामा करून द्या
- अन्यायकारक कलम रद्द करा
- १९९६ची पात्रता अट रद्द करा
- सर्व भाडेकरूंना न्याय द्या
- नियम फेरबदल होईपर्यंत बायोमेट्रिक पुढे ढकला