आरटीईच्या तिसऱ्या फेरीबाबत पालकांत संभ्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 06:40 AM2019-07-11T06:40:37+5:302019-07-11T06:40:43+5:30
दोन फेºया पूर्ण; अद्याप राज्यातील ४९ हजारांहून अधिक जागा रिक्त
मुंबई : बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क (आरटीई) कायद्यांतर्गत २५ टक्के आरक्षणांतर्गत होणाºया प्रवेश प्रक्रियेच्या दोन फेºया पूर्ण झाल्या आहेत. तरीही राज्यातील तब्बल १ लाख १६ हजार ८०८ जागांपैकी फक्त ६७ हजार जागांवरच विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याने तब्बल ४९ हजार ७५४ जागा रिक्त आहेत. आता आरटीईची तिसरी फेरी होणार की नाही, याबाबत पालक, विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे.
वारंवार येणाºया तांत्रिक अडचणींमुळे आरटीई प्रवेशाला विलंब होत असून त्यामुळेच पालकांनी या प्रवेशांकडे पाठ फिरवल्याचे बोलले जात आहे. आरटीई प्रवेशाची पहिली सोडत ८ एप्रिलला काढण्यात आली. या सोडतीत राज्यातून ६७ हजार ७०६ तर मुंबईतून ३ हजार ५३२ निवड झाली. विद्यार्थ्यांच्या अल्प प्रतिसादामुळे वारंवार मुदतवाढ देऊनही केवळ ४६ हजार ८४२ विद्यार्थ्यांच्या पालकांनी त्यांचे प्रवेश निश्चित केले तर मुंबईतून फक्त २ हजार २५९ बालकांनी प्रवेश घेतला आहे. त्यानंतर दुसरी सोडत तब्बल अडीच महिन्यांनंतर म्हणजे १५ जूनला काढण्यात आली. मात्र तोपर्यंत शाळा सुरू झाल्याने अनेक पालकांनी जिथे प्रवेश मिळेल त्या शाळेत पाल्यांना प्रवेश घेतले. त्यामुळे दुसºया सोडतीलाही पालकांचा अल्प प्रतिसाद मिळाला.
दुसºया सोडतीत राज्यातून फक्त २० हजार २१२ विद्यार्थ्यांनी तर मुंबईतून ८८७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. त्यामुळे राज्यभरातून दुसºया सोडतीनंतर फक्त ६७ हजार ५४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. आरटीई प्रवेशांतर्गत समाजातील वंचित व दुर्बल घटकांना प्रवेश देण्याचा उद्देश असला तरी या प्रक्रियेमध्ये वारंवार येणाºया तांत्रिक अडचणी व सरकारी अनास्थेमुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणात जागा रिक्त राहत आहेत. यंदाही सरकारच्या अनागोंदी कारभाराचा फटका आरटीई प्रवेश प्रक्रियेला बसला असून, दोन फेºया पूर्ण झाल्यांनतरही तब्बल ४९ हजार ७५४ जागा रिक्त राहिल्या आहेत. त्यामुळेच आता तिसºया फेरीबाबत पालक, विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे.
...म्हणूनच अनेक विद्यार्थी ठरले अपात्र
आरटीईच्या प्रवेश फेऱ्यांमध्ये पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी पालकांना प्रवेशासंबंधी वारंवार मोबाइलवर माहिती देण्यात येते. मात्र, काही पालकांनी शाळा व शिक्षण विभागाशी संपर्क न साधल्यामुळे अनेक विद्यार्थी अपात्र ठरले आहेत. तसेच दोन फेºयांमध्ये प्रवेशासाठी लॉटरी लागलेल्या विद्यार्थ्यांपैकी तेरा विद्यार्थी कागदपत्रांमधील त्रुटीमुळे अपात्र ठरत असल्याचेही समोर आल्याचे काही अधिकाºयांनी सांगितले आहे.