काँग्रेससोबत आघाडी हवी पण सन्मानजनक - सुनील तटकरे

By admin | Published: January 24, 2017 04:33 PM2017-01-24T16:33:47+5:302017-01-24T16:46:25+5:30

केंद्रात व राज्यात सत्तेत आलेल्या भारतीय जनता पक्षाचा कारभार हा आराजकतेकडे जाणारा आहे, या पक्षाच्या जातीयवादी विचारधारे विरोधात

Congratulation with the Congress but respected - Sunil Tatkare | काँग्रेससोबत आघाडी हवी पण सन्मानजनक - सुनील तटकरे

काँग्रेससोबत आघाडी हवी पण सन्मानजनक - सुनील तटकरे

Next

ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. 24 - केंद्रात व राज्यात सत्तेत आलेल्या भारतीय जनता पक्षाचा कारभार हा आराजकतेकडे जाणारा आहे, या पक्षाच्या जातीयवादी विचारधारे विरोधात धर्मनिरपेक्ष विचारांनी एकत्र आले पहिजे; ही राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आहे त्यामुळे आगामी महानगरपालिका तसेच जिल्हा परिषदांच्या निवडणूकांमध्ये काँग्रेस सोबत आघाडी करण्यास आम्ही तयार आहोत. याचा अर्थ काँग्रेस व समविचारी पक्षांनी राष्ट्रवादी कमकुवत आहे असा काढू नये, आम्हाला आघाडी हवीच आहे पण सन्माजनक अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी मांडली.  अकोला येथील खुले नाट्यगृहामध्ये माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश सोहळया निमित्त आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी मंचावर  आमदार प्रकाश गजभिये, राष्टÑवादीचे ज्येष्ठ नेते वसंतराव धोत्रे, माजी आमदार तुकाराम बिरकड, राष्ट्र काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय देशमुख, अकोला महानगर अध्यक्ष अजय तापडीया, वाशीम जिल्हा राष्टÑवादी काँग्रेसचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, विदर्भ संघटक रामेश्वर पवळ, संतोष कोरपे आदी उपस्थित होते. तटकरे म्हणाले की, भाजपा-सेनेच्या सत्तेने सामान्यांचा भ्रमनिरास केला आहे. अच्छे दिन, बॅक खात्यामध्ये १५ लाख असे स्वप्न सर्वसामान्य जनतेला दाखविले, हे स्वप्न प्रत्यक्षात येऊ शकत नाही हे याच पक्षाचे ज्येष्ठ मंत्री आता खुले आम सांगत आहे. तर दूसरीकडे शेतकरी उध्वस्त करण्याचे धोरण या सरकारचे आहे. काँग्रेसमुक्त भारत अशी घोषणा करणारे आता मुसलमान मुक्त भारत अशी वल्गना करून लागले आहेत. यावरून त्यांच्यामधील जातीयवादी विचार स्पष्टपणे समोर येतो.  हा देश लोकशाही विचारांचा देश असल्याने अशा धर्मांध शक्तींना जागा दाखविण्यासाठी धर्मनिरपेक्ष विचारांच्या पक्षाची मोट बांधणे आवश्यक आहे त्यामुळेच आघाडीसाठी आम्ही सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगीतले. माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांनी शिवसेना सोडण्यामागील कारणे विषद करतांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टिका केली. उद्धवांच्या आजूबाजुला हुजºयांची फौज आहे, त्यांना शेतीमधील काही कळत नाही; शेतकरी हिताचा एखादा प्रस्ताव त्यांच्याकडे घेऊन गेलो तर ते आपला पक्ष व्यापाºयांच्या भरवशावर चालतो अशी भूमिका मांडतात या शब्दात गावंडे यांनी आरोप केले. यावेळी जिल्हाध्यक्ष देशमुख यांचीही भाषण झाले. महानगर अध्यक्ष तापडीया  यांनी प्रस्तावना केली. या मेळाव्याला जिल्हाभरातून मोठी उपस्थिती होती. गावंडे यांच्या अनेक समर्थकांनी शिवसेना सोडून राष्ट्रवादीत प्रवेश घेतला.

Web Title: Congratulation with the Congress but respected - Sunil Tatkare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.