नांदेडमध्ये पुन्हा काँग्रेस
By admin | Published: February 24, 2017 04:46 AM2017-02-24T04:46:16+5:302017-02-24T04:46:16+5:30
नगरपालिका निवडणुकीनंतर काँग्रेसने जिल्हा परिषदेतही वर्चस्व प्रस्थापित करीत सर्वाधिक जागांवर
नांदेड : नगरपालिका निवडणुकीनंतर काँग्रेसने जिल्हा परिषदेतही वर्चस्व प्रस्थापित करीत सर्वाधिक जागांवर विजय मिळविला आहे़ राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेतल्यास पुन्हा एकदा नांदेड जिल्हा परिषदेवर आघाडीचा झेंडा फडकणार आहे़
मागील निवडणुकीच्या तुलनेत काँग्रेसच्या जागा तीनने वाढल्या असल्या तरी राष्ट्रवादीचे संख्याबळ आठने घटले आहे़ त्याचवेळी शिवसेनेने अधिकची एक जागा मिळविली़ तर भाजपाने तिप्पट जागांवर कमळ फुलविले आहे़ या निवडणुकीत सर्वच पक्षांनी स्वबळावर प्रतिष्ठा पणाला लावली़ मागील सत्ता स्थापनेची गणिते पाहता जिल्ह्यात आघाडीचा पॅटर्न राबविला जाईल़ परंतु जिल्हा बँकेत मात्र काँग्रेस विरूद्ध सर्व हे चित्र होते़ तथापि, मागील अनुभव पाहता शेवटच्या क्षणी आघाडीवरच शिक्कामोर्तब होईल़
६३ पैकी २८ जागा जिंकून काँग्रेसने पुन्हा एकदा जिल्ह्याच्या राजकारणातील वर्चस्व सिद्ध केले आहे़ केंद्र व राज्यातील सत्ता बदलानंतरही विधान परिषद, नगरपालिकांच्या निवडणुकीत काँग्रेसने जिल्ह्यावरील आपली पकड कायम ठेवली होती़ तोच कित्ता जिल्हा परिषदेत गिरविला़ यावेळी अध्यक्षपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी असल्याने हदगाव, मुखेड व बिलोली तालुक्यातील लढती लक्षवेधी ठरल्या़ या निवडणुकीत केंद्र व राज्यातील सत्तेचा फायदा भाजपाला मिळाला़ त्यांनी ४ वरून १३ वर मजल मारली़ (प्रतिनिधी)
नांदेड
पक्षजागा
भाजपा१३
शिवसेना१०
काँग्रेस२८
राष्ट्रवादी१०
इतर०२