काँग्रेसने नारायण राणेंना बारा वर्ष सडवले, आता भाजपवाले कुजवून कुजवून मारतील - सुभाष देसाई

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2017 06:30 PM2017-10-07T18:30:24+5:302017-10-07T18:31:31+5:30

काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन स्वत:चा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष काढणा-या नारायण राणेंवर शिवसेनेचे नेते आणि मंत्री सुभाष देसाई यांनी सडकून टीका केली.

Congress announces 12 years for Narayan Rane, BJP will scowl at worst: Subhash Desai | काँग्रेसने नारायण राणेंना बारा वर्ष सडवले, आता भाजपवाले कुजवून कुजवून मारतील - सुभाष देसाई

काँग्रेसने नारायण राणेंना बारा वर्ष सडवले, आता भाजपवाले कुजवून कुजवून मारतील - सुभाष देसाई

Next

रत्नागिरी - काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन स्वत:चा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष काढणा-या नारायण राणेंवर शिवसेनेचे नेते आणि मंत्री सुभाष देसाई यांनी सडकून टीका केली. जो पक्ष सत्तेत असेल त्यांच्यासमोर नारायण राणे लोटांगण घालतात. आता कुठे गेला तुमचा स्वाभिमान ? असा सवाल त्यांनी राणेंना विचारला.  काँग्रेसने नारायण राणेंना बारा वर्ष सडवले, आता भाजपवाले कुजवून कुजवून मारतील अशी आगपाखड देसाई यांनी केली. 

दरम्यान नारायण राणेंचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये सहभागी होणार आहे. नारायण राणेंनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. नारायण राणे यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर १ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्थापन केला. रायण राणे यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची घोषणा केल्यापासून त्यांचा पक्ष एनडीएमध्ये दाखल होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. 

राणेंनी आपला पक्ष एनडीएमध्ये सहभागी होत असल्याची घोषणा केली. त्यावेळी आमदार नितेश राणेंसह अनेक आमदार आपल्या पक्षात येतील, असा दावा केला. मात्र मंत्रिपदाबाबत विचारले असता, आपल्या मंत्रिपदाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाच अंतिम निर्णय घेईल, असे त्यांनी सांगितले. त्याबरोबरच ग्रामपंचायत निवडणुकींत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे 29 सरपंच बिनविरोध निवडून आल्याचा त्यांनी आवर्जुन उल्लेख केला.

नीतेश राणेंसह अन्य आमदारही सामिल होतील
आपण एनडीएला पाठिंबा दिला असून आता आपल्या मंत्रिपदाबाबत मुख्यमंत्री आणि भाजप पक्षश्रेष्ठी योग्य निर्णय घेतील. असे राणे यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच स्वाभिमान पक्षात आमदार नीतेश राणेंसह राज्यातील अनेक आमदार सामिल होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

स्वाभिमानचे २९ सरपंच बिनविरोध
आपण स्थापन केलेल्या नव्या स्वाभिमान पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात २९ सरपंच बिनविरोध निवडून आल्याचे राणे यांनी यावेळी स्पष्ट केले. काँग्रेस, शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी या कोणत्याही पक्षाचा अजून एकही सरपंच निवडून आलेला नसताना केवळ स्वाभिमान पक्षाचे २९ सरपंच निवडून आल्यामुळे आपली विजयी पताका रोवण्यात आली आहे. आगामी काळात स्वाभिमान पक्ष असेच उज्वल यश संपादन करेल.राणे यांनी काँग्रेसमध्ये असतानाच समर्थ विकास पॅनेलचे स्थापना केली आहे. या पॅनेलच्या माध्यमातून राणे समर्थक सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीला सामोरे जात आहेत. गुरूवारी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा दिवस होता. या दिवसापर्यंत सिंधुदुर्गात निवडणुका होत असलेल्या ३२५ ग्रामपंचायतींपैकी २९ ठिकाणचे सरपंच हे समर्थ विकास पॅनेलकडून बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे राणेंच्या स्वाभिमान पक्षाला सिंधुदुर्गातून यश मिळण्यास सुरूवात झाली आहे. असे राणे यांनी यावेळी स्पष्ट केले.

Web Title: Congress announces 12 years for Narayan Rane, BJP will scowl at worst: Subhash Desai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.