'काँग्रेस दर्शन' मुखपत्राचा वाद, मुखपत्राच्या कन्टेंट एडिटरची हकालपट्टी

By Admin | Published: December 28, 2015 05:42 PM2015-12-28T17:42:13+5:302015-12-28T17:42:13+5:30

'काँग्रेस दर्शन' मुखपत्राचे संपादक सुधीर जोशी यांना निलंबित करण्यात आले आहे. मुंबई काँग्रेसच्या 'काँग्रेस दर्शन' या मुखपत्रातून स्वपक्षीय नेत्यांवरच टीकेची झोड उठवण्यात आली होती

The 'Congress Darshan' mouthpiece case, the expulsion of the content editor of the post | 'काँग्रेस दर्शन' मुखपत्राचा वाद, मुखपत्राच्या कन्टेंट एडिटरची हकालपट्टी

'काँग्रेस दर्शन' मुखपत्राचा वाद, मुखपत्राच्या कन्टेंट एडिटरची हकालपट्टी

googlenewsNext

 ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि २८ -  'काँग्रेस दर्शन' मुखपत्राचे संपादक (कन्टेंट एडिटर) सुधीर जोशी यांना निलंबित करण्यात आले आहे. मुंबई काँग्रेसच्या 'काँग्रेस दर्शन' या मुखपत्रातून स्वपक्षीय नेत्यांवरच टीकेची झोड उठवण्यात आल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. 
काँग्रेस पक्ष आज आपला १३१वा स्थापना दिवस साजरा करत असतानाच मुखपत्रातून स्वपक्षीय नेत्यांवरच टीकेची झोड उठवण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. 
या लेखात काश्मीर प्रश्नासाठी पंडित जवाहरलाल नेहरु यांना जबाबदार धरण्यात आले आहे. त्यांनी आंतरराष्ट्रीय  विषयांवर सरदार वल्लभाई पटेल यांची मत, विचार ऐकायला पाहिजे होते . सोनिया गांधींचे वडिल फॅसिस्ट सैनिक होते असेही या  मुखपत्रात म्हटले आहे. 
या लेखावर देशभर चर्चा होत असताना संपादक संजय निरुपम यांनी माफी मागितली आहे. ते म्हणाले, की मी या अंकाचा संपादक असलो तरी दररोज याकडे पाहत नाही.  भविष्यात अशा प्रकारची चूक होणार नाही, याकडेही लक्ष देण्यात येईल.

Web Title: The 'Congress Darshan' mouthpiece case, the expulsion of the content editor of the post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.