काँग्रेसला मराठा समाजाला आरक्षण द्यायचेच नव्हते! - रावसाहेब दानवे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2019 02:08 AM2019-06-30T02:08:09+5:302019-06-30T02:08:28+5:30
भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या दोन दिवसीय बैठकीला शनिवारी नाशिकमध्ये सुरुवात झाली. या बैठकीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
नाशिक : काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडी सरकारने १६ टक्के आरक्षण दिले होते, असा प्रचार केला जातो. यात तथ्य नाही. काँग्रेसला मराठा समाजाला आरक्षण द्यायचेच नव्हते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत सपाटून पराभव झाल्याने तत्क ाळ राणे समिती नेमून काँग्रेसने आरक्षणाची घोषणा केली. त्यामुळे हे आरक्षण न्यायालयात टिकू शकले नाही. मात्र भाजप सरकारने मागासवर्गीय आयोगाची नेमणूक करून मराठा समाजाला घटनात्मक पद्धतीने आरक्षण मिळवून दिल्याचा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे.
भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या दोन दिवसीय बैठकीला शनिवारी नाशिकमध्ये सुरुवात झाली. या बैठकीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
महिलांना विधानसभेत व लोकसभेतही ३३ टक्के आरक्षण देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. लोकांपर्यंत शासकीय योजना पोहचत नसतील तर त्यास सरकार नव्हे तर त्या पक्षाचे कार्यकर्ते जबाबदार असल्याचेही त्यांनी सांगितले. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रक्षाबंधन आणि सभासद नोंदणी अभियान राबविण्यात येणार असल्याचे रहाटकर यांनी सांगितले.