काँग्रेसला आदिवासींचा विसर - नरेंद्र मोदी

By admin | Published: October 13, 2014 11:59 AM2014-10-13T11:59:04+5:302014-10-13T13:03:19+5:30

स्वातंत्र्याच्या लढाईत महत्वाची भूमिका बजावणा-या आदिवासी समाजाचा काँग्रेसला विसर पडल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली.

Congress forgets tribals - Narendra Modi | काँग्रेसला आदिवासींचा विसर - नरेंद्र मोदी

काँग्रेसला आदिवासींचा विसर - नरेंद्र मोदी

Next
>ऑनलाइन लोकमत
पालघर, दि. १३ - स्वातंत्र्याच्या लढाईत महत्वाची भूमिका बजावणा-या आदिवासी समाजाचा काँग्रेसला विसर पडला असून इतक्या वर्षांत त्यांनी आदिवासी समाजाच्या हितासाठी एकही काम केले नाही, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला. विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस असून पालघरमधील सभेत बोलताना पंतप्रधानांनी काँग्रेसवर कडाडून टीका करत आपल्या आत्तापर्यंतच्या कामाचा जनतेला लेखाजोगाही दिला. 
स्वातंत्र्य मिळाल्यापासून देशात काँग्रेसचे सरकार आहे, मात्र त्यांनी कधीच आदिवासी समाजाच्या हिताचा, कल्याणाचा विचार केला नाही. इतक्या वर्षांत त्यांना आदिवासींसाठी एक मंत्रालय बनवता आले नाही, काँग्रेसला आदिवासींचा विसर पडला आहे अशी टीका त्यांनी केली. वाजपेयींच्या काळात आदिवासींसाठी वेगळे मंत्रालय झाले, आदिवासींना मंत्री बनवण्यात आले. आमच्या सरकारने या बजेटमध्येही आदिवासींसाठी अनेक योजना आणल्या आहेत, असे ते म्हणाले. 
महाराष्ट्र व गुजरातमधील मच्छिमार एकमेकांच्या सुखदु:खातील साथीदार असल्याचा उल्लेखही त्यांनी या सभेत केला. अनेक मच्छिमार शेजारील देशातील तुरुंगात कैद असल्याचे सांगत मच्छिमारांच्या हिताबद्दल विचार करणे हे माझे काम असल्याचे ते म्हणाले. तसेच पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यावर सर्वात पहिल्यांदा मी पाकिस्तानचे अध्यक्ष नवाझ शरीफ यांच्याशी याच मुद्यावर चर्चा केली, असे त्यांनी सांगितले. पाकिस्तानमधील २०० मच्छिमारांची सुटका झाली, इराकमध्ये अडकलेल्या नर्सेसचीही सुटका झाल्याचेही त्यांनी नमूद केले. 
नुकत्याच निर्माण झालेल्या पालघर जिल्ह्याबद्दल बोलताना त्यांनी ज्याप्रमाणे नवजात बाळाची पालक, नातेवाईक काळजी घेतात, त्याचप्रमाणे नवीन जिल्ह्याची काळजी घेणे हे सरकारचे काम असते. त्यामुळे केंद्राप्रमाणे महाराष्ट्रातही भाजपाला पूर्ण बहुमत द्या आणि तुमच्या जिल्ह्याच्या विकास करण्याची संधी द्या, असे आवाहन त्यांनी केले. 

Web Title: Congress forgets tribals - Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.