निवडणुकांमध्ये काँग्रेसलाच यश मिळेल

By admin | Published: September 22, 2016 04:59 AM2016-09-22T04:59:47+5:302016-09-22T04:59:47+5:30

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाला निर्भेळ यश मिळेल, असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला.

Congress gets success in elections | निवडणुकांमध्ये काँग्रेसलाच यश मिळेल

निवडणुकांमध्ये काँग्रेसलाच यश मिळेल

Next


मुंबई : राज्यातील भाजप-शिवसेना सरकारचे अपयश उघडे झाले असून राज्यातल्या जनतेचा तीव्र असंतोष पाहता आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाला निर्भेळ यश मिळेल, असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला.
राज्यातील २६ जिल्ह्यातील २१४ नगरपालिका, नगरपंचायतींच्या निवडणुका येत्या डिसेंबरमध्ये होणार आहेत. या निवडणुकांच्या नियोजनासंदर्भात काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या टिळक भवनात आयोजित करण्यात आली होती. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना चव्हाण म्हणाले, राज्य सरकार या निवडणुकांमध्ये राजकीय हस्तक्षेप करत असून जाणीवपूर्वक संभ्रमावस्था ठेवण्याचा प्रयत्न सुरु आहे. नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडण्याचा निर्णय घेऊनही याबाबत सरकारकडून निवडणुक आयोगाला अंधारात ठेवण्याचे काम होत आहे. पंरतु काँग्रेस पक्ष एकदिलाने या निवडणुका लढेल आणि काँग्रेस पक्षाचे सर्व नेते जोमाने निवडणुकीला सामोरे जातील, असा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला.
मराठा आणि मुस्लीम आरक्षणा संदर्भात राज्य सरकार जाणीवपूर्वक चालढकल करीत आहे. त्याचबरोबर दलित समाजात गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. एट्रोसिटी कायदा रद्द करण्यासंदर्भात काँग्रेसचा तीव्र विरोध राहील, असे सांगताना चव्हाण यांनी या कायद्याची अंमलबजावणी करताना शासनातर्फे त्याचा दुरुपयोग होऊ नये याकरिता उपाययोजना कराव्यात असे म्हटले आहे. याबरोबरच राज्याचे माजी मुख्यमंत्री सहकारमहर्षी कै. वसंतदादा पाटील यांचे जन्मशताब्दी वर्ष १३ नोव्हेंबरपासून काँग्रेस पक्षाकडून राज्यभरात साजरे करण्यात येणार आहे, असे चव्हाण म्हणाले.
बैठकीत निवडणुकांसंदर्भात कार्यकर्त्यांचे मेळावे, बैठका, निवडणुकांच्या नियोजनाच्या संदर्भात समग्र चर्चा झाली. बैठकीला विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे आदी उपस्थित होते.

(विशेष जाहप)

Web Title: Congress gets success in elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.