पूरग्रस्तांना घरे देण्याचा निर्णय काँग्रेसचा

By admin | Published: September 19, 2016 12:46 AM2016-09-19T00:46:05+5:302016-09-19T00:46:05+5:30

हस्तांतर झालेल्या घरांना नियमित करण्याचा निर्णय तत्कालीन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी १५ जुलै २०१४ मध्ये घेतला होता.

Congress has decided to give houses to flood victims | पूरग्रस्तांना घरे देण्याचा निर्णय काँग्रेसचा

पूरग्रस्तांना घरे देण्याचा निर्णय काँग्रेसचा

Next


पुणे : पानशेत पूरग्रस्तांना भाडेपट्ट्याने देण्यात आलेली घरे मालकीहक्काची करून देण्याचा तसेच हस्तांतर झालेल्या घरांना नियमित करण्याचा निर्णय तत्कालीन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी १५ जुलै २०१४ मध्ये घेतला होता. तरीही भाजपाच्या काही मंत्री व आमदारांकडून फुकटचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टीका काँग्रेसचे माजी आमदार मोहन जोशी यांनी रविवारी केली.
पानशेत धरण १२ जुलै १९६१ रोजी फुटले, त्यामध्ये नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना शहरात १३ ठिकाणी भाडेपट्ट्याने घरे देण्यात आली. पूरग्रस्तांनी त्यांना दिलेल्या गाळ्याच्या सभोवताली असलेल्या मोकळ्या जागेत वाढीव बांधकाम केले. तसेच काही पूरग्रस्तांनी सोसायट्या स्थापन केल्या होत्या, अशा १०३ सोसायट्यांना ९९ वर्षांच्या भाडेपट्ट्याने शासनाने जागा दिली होती.
पुणेकरांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, ते सोडविण्यासाठी भाजपाकडून काहीही भरीव काम करण्यात आलेले नाही. त्यामुळे न केलेल्या कामावर धादांतपणे दावा भाजपाकडून केला जात आहे. पुणेकरांना आणि पूरग्रस्तांना सत्य परिस्थिती माहीत आहे. (प्रतिनिधी)
आमने-सामने चर्चेची तयारी
पानशेत पूरग्रस्तांबाबत घेतलेल्या निर्णयाबाबत भाजपाच्या कोणत्याही नेत्याशी आमने-सामने चर्चा करण्याची तयारी असल्याचे माजी आमदार मोहन जोशी यांनी स्पष्ट केले आहे. पूरग्रस्तांबाबत घेण्यात आलेल्या सर्व निर्णयांची कागदपत्रे माझ्याकडे आहेत, असेही जोशी यांनी सांगितले आहे.

Web Title: Congress has decided to give houses to flood victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.