काँग्रेसचे महाराष्ट्रातील १३ जिल्हाध्यक्ष जाहीर

By admin | Published: April 13, 2016 02:02 AM2016-04-13T02:02:51+5:302016-04-13T02:02:51+5:30

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी नागपुरातून परतताच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीची नव्याने बांधणी करीत १३ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती केली आहे.

The Congress has declared 13 District President of the Congress | काँग्रेसचे महाराष्ट्रातील १३ जिल्हाध्यक्ष जाहीर

काँग्रेसचे महाराष्ट्रातील १३ जिल्हाध्यक्ष जाहीर

Next

- शीलेश शर्मा,  नवी दिल्ली
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी नागपुरातून परतताच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीची नव्याने बांधणी करीत १३ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती केली आहे. शिवाय प्रदेश काँग्रेस समितीसाठी प्रस्तावित नावांना आपली मंजुरीही दिली.
असे आहेत जिल्हाध्यक्ष
ज्या १३ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली त्यात अब्दुल सत्तार (औरंगाबाद ग्रामीण), नामदेवराव पवार (औरंगाबाद शहर),सुरेश टावरे (ठाणे ग्रामीण), सुरेश वरपुडकर (परभणी ग्रामीण), रमेश बागवे (पुणे शहर), संजय जगताप (पुणे ग्रामीण), डोमनिक डीमेलो (वसई-विरार), प्रकाश श्यामराव पाटील (सोलापूर ग्रामीण),सुधीर खरतमल (सोलापूर शहर), शेख रशीद शेख शफी (मालेगाव), मनोज शिंदे (ठाणे शहर), राजकिशोर उर्फ पापा मोदी (बीड) आणि दत्ता सामंत (सिंधुदुर्ग) यांचा समावेश आहे.
यासोबतच १८ उपाध्यक्षही नियुक्त करण्यात आले आहेत. यात संजय निरुपम, रजनी पाटील,रत्नाकर महाजन, तुकाराम रेंगे, सुबोध मोहिते, हुसेन दलवाई, नितीन राऊत, उल्हास पाटील, चंद्रकांत हंडोरे,भाई जगताप, शरद रणपिसे, से. सी. पडवी, रवी पाटील, नतिकोद्दिन खातीब, सदाशिव पाटील, सुभाष कानडे, केशवराव औताडे नसीम खान, विजय वडेट्टीवार यांची वर्णी लागली आहे. सुरेश शेट्टी यांच्याकडे कोषाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
सरचिटणीसांच्या यादीत त्यात मुझफ्फर हुसेन, हरिभाउ राठोड, अमित देशमुख, बसवराज पाटील, मुरुमकर, रामहरी रुपनवार, निलेश राणे, माणिकराव जगताप, शिरीष चौधरी, डॉ. शोभा बच्छाव, नंदकुमार झांवरे, नरेश ठाकरे, विजय खडसे, सुभाष धोटे, बंडुभाउ सावरबांधे, एस. क्यू. जामा,सुरेश इंगळे, चंद्रकांत छाजेड, प्रकाश येलगुलवार, छत्रपती मालोजीराजे भोसले, राजेश शर्मा, सचिन सावंत, प्रकाश सोनावणे, भुपेंद्र गुप्ता, राजन भोसले, राज श्रॉफ, रमेश शेट्टी, योगेश दंड, विश्वनाथ पाटील, रमाकांत म्हात्रे, तारीक फारुकी, सुमन आग्रवाल, मुश्ताक अंतुले, ललिता पाटील, विनायक देशमुख, शाम उमाळकर, गणेश पाटील, मदन भरगड, किशोर बोरकर, संजय खोडके, रामकिशन ओझा, अभिजीत सपकाळ, बबनराव तायवाडे, प्रफुल्ल गुडधे-पाटील, सुरेश भोयर, झिया पटेल, बी. आर. कदम, टी. पी. मुंडे, हरिभाउ शेळके, लियाकत अन्सारी, अशोक पाटील निलंंगेकर, शिवाजी पाटील कव्हेकर, सुभाष झांबड, अरुण मुगदिया, कल्याण दळे, अलका राठोड, अभय छाजेड, पूथ्वीराज साठे, मोहन जोशी, धर्मा भोसले, रोहित टिळक, पी. एन. पाटील आणि यशवंत हप्पे यांचा समावेश आहे.
सचिवांची यादीत ६० जणांना स्थान मिळाले आले आहे. त्यांची नावे पुढीलप्रमाणे : झिशान अहमद, मेहुल वोरा, अल नसीर झकेरिया, ग्रेगरी डिसोझा, आबा दळवी, संतोष शेट्टी, दत्ता नार, विजय पाटील, के.वृशाली, प्रकाश मुथा, श्याम म्हात्रे, राणी अग्रवाल, अविनाश रामिष्टे, सुधीर पवार, कैलास पाटील, विनय राणे, अलका पावसकर, रमेश कीर, संजय चौपाणे, बाळकृष्ण पुर्णेकर, फजल अन्सारी, हेमलता पाटील, शाहू खैरे, अश्विनी बोरस्ते, डी.जी.पाटील, सुधीर ढोणे, प्रकाश साबळे, वजाहत मिर्झा, मोहम्मद नदीम, प्रमिला कुटे, विनोद जैन, प्रमोद तित्तरमारे, उमाकांत अग्निहोत्री, शेखर शेंडे, रवींद्र दरेकर, नितीन कुंभलकर, नाना गावंडे, मुजीब पठाण, डॉ.योगेंद्र भगत, आसावरी विजय देवतळे, हफीज अब्दुल, बाबूराव कुळकर्णी, सत्संग मुंडे, अशोक सायन्ना, ज्योती संजय पवार, अमर खानापुरे, विजय कामड, शेहजाद पुनावाला, तौफिक मुल्लानी, सत्यजित देशमुख, प्रकाश सातपुते, संजय बलगुडे, भाऊसाहेब भोईर, संगीता देवकर, अजित आपटे, हरिदास चारवड, सुधीर जनज्योत, अस्मिता काटे, अतुल कोटेचा, शमशेरसिंग सोधी. प्रवक्ते - अनंत गाडगीळ, उल्हास पवार, रत्नाकर महाजन, हरिश रोग्ये, भाई जगताप, सचिन सावंत, राजू वाघमारे, नीला लिमये, हेमलता पाटील, सुधीर ढोबे.

सल्लगार परिषद
काँग्रेसने सल्लागार परिषदही स्थापन केली असून त्यात शिवराज पाटील, शिवाजीराव पाटील निलंगेकर, प्रतापराव भोसले, शिवाजीराव देशमुख, बाळासाहेब विखे पाटील, शांताराम पोटदुखे, देवीसिंह शेखावत, एन.एम. कांबळे, केशवराव पारधी, कल्लप्पा आवाडे,अनंतराव थोपटे, निर्मलाताई ठोकळ, धर्मांण्णा सादुल आदींचा समावेश आहे.

६२ सदस्यांची कार्यकारिणी
६२ सदस्यीय कार्यकारिणी स्थापन करण्यात आली असून सुशीलकुमार शिंदे,पृथ्वीराज चव्हाण, विलास मुत्तेमवार, विजय दर्डा, मुकुल वासनिक, गुरुदास कामत,अविनाश पांडे, भालचंद्र मुगणेकर, प्रिया दत्त, मिलिंद देवरा, नारायण राणे, माणिकराव ठाकरे,पतंगराव कदम, हुसेन दलवाई आदी नेत्यांचा त्यात समावेश आहे.

Web Title: The Congress has declared 13 District President of the Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.