काँग्रेस अखंड महाराष्ट्रवादीच!
By admin | Published: August 28, 2016 01:29 AM2016-08-28T01:29:19+5:302016-08-28T01:29:19+5:30
विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे काहीही म्हणत असले तरी काँग्रेस अखंड महाराष्ट्रवादीच आहे. या विषयावर लवकरच महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांसह काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया
पुणे : विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे काहीही म्हणत असले तरी काँग्रेस अखंड महाराष्ट्रवादीच आहे. या विषयावर लवकरच महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांसह काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार असल्याचे आमदार नारायण राणे यांनी सांगितले. ‘तुम्ही लढा, मी कपडे सांभाळतो’ असे करणाऱ्यांनी न्यायालयाशी भांडण्याऐवजी सरकारबरोबर भांडावे, अशी टीकाही त्यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे नाव न घेता केली.
स्वतंत्र विदर्भाबाबत काँग्रेसची भूमिका अद्याप ठरलेली नाही, असे वक्तव्य करणाऱ्या माणिकराव ठाकरे यांनी आपण अखंड महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे उपसभापती आहोत हे लक्षात ठेवावे, असे राणे म्हणाले. गोहत्याबंदी कायदा काँग्रेसने आणला नाही. युती सरकारमध्ये मी पशुसंवर्धनमंत्री असताना गोहत्याबंदी कायद्याचा प्रस्ताव आला होता, पण मला हा कायदा मान्य नाही, असेही राणे म्हणाले.
असहिष्णुता, जातीयवाद व धर्मवाद या तिन्ही गोष्टी राज्य व केंद्र सरकारमध्ये आहेत. त्यामुळेच दलित, अल्पसंख्याकांवर हल्ले होत आहेत, असा आरोपही राणे यांनी या वेळी केला. (प्रतिनिधी)