Deglur By-Election: शिवसेनेतून आयात केलेल्या उमेदवाराने केला 'भाजपाचा' घात; देगलूरमधून काॅंग्रेसचे अंतापूरकर विजयी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2021 07:15 AM2021-11-03T07:15:35+5:302021-11-03T07:24:27+5:30

Deglur By-Election Result: मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच अंतापूरकर आघाडीवर होते. ही आघाडी त्यांनी शेवटपर्यंत कायम राखली.

Congress Jitesh Antapurkar wins from Deglur By-Election by huge margin pdc | Deglur By-Election: शिवसेनेतून आयात केलेल्या उमेदवाराने केला 'भाजपाचा' घात; देगलूरमधून काॅंग्रेसचे अंतापूरकर विजयी

Deglur By-Election: शिवसेनेतून आयात केलेल्या उमेदवाराने केला 'भाजपाचा' घात; देगलूरमधून काॅंग्रेसचे अंतापूरकर विजयी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
देगलूर (जि. नांदेड) : भाजपने प्रतिष्ठेच्या केलेल्या देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीत काॅंग्रेसचे उमेदवार जितेश अंतापूरकर ४१ हजार ९३३ मताधिक्य घेऊन विजयी झाले. त्यांनी भाजपचे उमेदवार सुभाष साबणे यांचा दणदणीत पराभव केला. 

मतमोजणीच्या ३० फेऱ्या झाल्या. यामध्ये अंतापूरकर यांना १ लाख ०८ हजार ७८९ तर सुभाष साबणे यांना ६६ हजार ८७२ मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. उत्तम इंगोले यांना ११ हजार ३४७ मतांवर समाधान मानावे लागले. टपाली  मतदानातही अंतापूरकर यांनी आघाडी घेतली. त्यांना ५१ तर सुभाष साबणे यांना ३५ मते मिळाली.

मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच अंतापूरकर आघाडीवर होते. ही आघाडी त्यांनी शेवटपर्यंत कायम राखली. देगलूर आणि बिलोली तालुक्यातही अंतापूरकरांना मताधिक्य मिळाले. ३० फेऱ्यापैकी १० फेऱ्या बिलोली तालुक्यातील होत्या. बिलोली तालुक्यात अंतापूरकर यांना १० हजार ९६९ मतांची आघाडी मिळाली. तर देगलूर तालुक्यात सुमारे ३० हजार ९६७ मतांचे मताधिक्य त्यांना मिळाले. एकूणच ही निवडणूक एकतर्फी ठरली. यानिमित्ताने अनेकांचे अंदाज चुकले.

मिळालेली मते
जितेश अंतापूरकर (काँग्रेस) - १,०८,७८९
सुभाष साबणे  (भाजप)- ६६,८७२
 

Web Title: Congress Jitesh Antapurkar wins from Deglur By-Election by huge margin pdc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.