VIDEO: उद्घाटनापूर्वीच समृद्धी महामार्गावरून आशिष देशमुखांचा सुस्साट प्रवास; व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2022 11:33 AM2022-04-21T11:33:24+5:302022-04-21T11:38:21+5:30
२०० किलोमीटर प्रतितास वेगानं देशमुखांनी समृद्धी महामार्गावर सुस्साट पळवली कार
नागपूर: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते समृद्धी महामार्गाचं उद्घाटन होणार आहे. मात्र त्याआधीच काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी समृद्धी महामार्गावरून कारनं प्रवास केला आहे. २०० किलोमीटर प्रतितास वेगानं देशमुख यांनी समृद्धी महामार्गावरून सुस्साट प्रवास केला. उद्घाटनापूर्वीच देशमुखांनी केलेल्या प्रवासामुळे नवा वाद उद्भवण्याची शक्यता आहे.
विदर्भातील जनतेनं समृद्धी महामार्गाचा फायदा घ्यावा, असं आवाहन देशमुख यांनी कार चालवत असताना केलं. विदर्भात औद्योगिकरण करा. विदर्भात तयार होणारा माल जगात पोहोचवा. मेड इन विदर्भाच्या माध्यमातून वस्तू जगापर्यंत पोहोचवा. हा रस्ता अतिशय चांगला आहे. यावर दोनशेच्या वेगानं वाहनं धावू शकतात. सरकारनं अतिशय चांगलं काम आहे. उद्घाटन झाल्यानंतर या महामार्गाच्या माध्यमातून घराघरापर्यंत समृद्धी आणा, असं देशमुख म्हणाले.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होण्याआधीच काँग्रेस नेते आशिष देशमुखांचा समृद्धी महामार्गावरून प्रवास https://t.co/CbvSFUjpi9pic.twitter.com/41xPvPyQUI
— Lokmat (@lokmat) April 21, 2022
समृद्धी महामार्गाचं काम नागपूरपर्यंत पूर्ण झालं आहे. सध्या बुलडाणा, वाशिम पट्ट्याचं काम सुरू आहे. २ मे रोजी समृद्ध महामार्गाचं उद्घाटन होणार असल्याची माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंनी गेल्याच आठवड्यात केली होती. मात्र त्यापूर्वीच काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी कार चालवल्यानं नवा वाद होण्याची शक्यता आहे.