'सत्ता गेल्याने भाजपचे नेते वैफल्यग्रस्त झाले आहेत'
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2020 11:34 AM2020-01-29T11:34:20+5:302020-01-29T11:45:20+5:30
केंद्रात सत्तेत असल्याने कोणी संविधान पेक्षा मोठे होत नाही.
मुंबई : एल्गार परिषदेचा तपास एनआयएकडे वर्ग करण्यात आला आहे. मात्र जर राज्याकडून संविधानाचा अवमान करणे, केंद्राला सहकार्य न केल्यास घटनात्मक पेच निर्माण होईल. तसेच केंद्राकडून राज्य सरकार बरखास्त केले जाऊ शकते असा इशाराच भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी ठाकरे सरकाराला दिला होता. तर याच मुद्यावरून महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मुनगंटीवार आणि भाजपवर निशाणा साधला आहे.
थोरात म्हणाले की, "सत्ता गेल्याने भाजपचे नेते वैफल्यग्रस्त झाले आहेत. सरकारचे कामकाज राज्यघटनेनुसार चालते. केंद्रात सत्तेत असल्याने कोणी संविधान पेक्षा मोठे होत नाही. कोणी तशी समजूत करून घेऊ नये. कोणी म्हटलं म्हणून सरकार बरखास्त होत नाही. असे म्हणत थोरात यांनी भाजपला खोचक टोला लगावला.
सत्ता गेल्याने भाजपचे नेते वैफल्यग्रस्त झाले आहेत. सरकारचे कामकाज राज्यघटनेनुसार चालते. केंद्रात सत्तेत असल्याने कोणी संविधान पेक्षा मोठे होत नाही. कोणी तशी समजूत करून घेऊ नये. कोणी म्हटलं म्हणून सरकार बरखास्त होत नाही.@PTI_News@MiLOKMAT@mataonline@LoksattaLive@ANIpic.twitter.com/Y3E2DhOScM
— Balasaheb Thorat (@bb_thorat) January 28, 2020
केंद्रातल्या कायद्याच्या तरतुदीबाहेर जाऊन कोणतं राज्य कृत्य करत असेल तर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या काळात त्यांनी ९७ राज्यं बरखास्त केली होती. त्यानंतर अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात या कायद्यात बदल केला. त्यामुळे सहजासहजी राज्य बरखास्त होऊ शकत नाही मात्र विरोधी कृत्याला पांघरुन घालणे, राज्य सरकार म्हणून त्यात सहभाग घेणे तर यातून गंभीर कारवाईला सामोरं जावं लागेल, असे मुनगंटीवार म्हणाले होते.