काँग्रेस नेते गुरूदास कामतांचा राजकारणातील निवृत्तीचा निर्णय मागे

By admin | Published: June 23, 2016 12:53 PM2016-06-23T12:53:56+5:302016-06-23T13:13:08+5:30

माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरूदास कामत यांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याचा निर्णय मागे घेतला आहे.

Congress leader Gurudas Kamatra's decision to retire from politics | काँग्रेस नेते गुरूदास कामतांचा राजकारणातील निवृत्तीचा निर्णय मागे

काँग्रेस नेते गुरूदास कामतांचा राजकारणातील निवृत्तीचा निर्णय मागे

Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २३ - माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरूदास कामत यांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याचा निर्णय मागे घेतला आहे. कॉंग्रेसचे महाराष्ट्रातील एक दिग्गज नेते असलेल्या कामत यांनी दोन आठवड्यांपूर्वी वैयक्तिक कारण देत कॉंग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने एकच खळबळ उडाली होती.
(गुरुदास कामत यांचा राजकारणातून संन्यास)
( सोनिया गांधींकडून गुरुदास कामत यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न) 
  •  
मुंबईतील महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर असतानाच, त्यांनी अचानक राजकारणातून संन्यास घेण्याचा निर्णय घेतल्याने कॉंग्रेसला मोठा धक्का बसला पण कामत त्यांच्या निर्णयावर ठाम होते. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांची काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी चर्चा झाली व अखेर आज त्यांनी राजीनाम्याचा निर्णय मागे घेतला असून ते  गुजरात, राजस्थान आदी राज्यांच्या प्रभारीपदी कायम राहणार आहेत. 
 
पाच वेळा खासदार राहिलेले कामत यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेऊन राजीनाम्याची इच्छा व्यक्त केली होती. तशा आशयाचे पत्र त्यांनी सोनिया गांधी व राहुल गांधी यांना पाठविले होते. त्याचे काहीही उत्तर न आल्याने ६ जून रोजी त्यांनी राजकारणातून संन्यास घेण्याचा निर्णय जाहीर केला होता.  मुंबई काँग्रेसमध्ये अनेक वर्षे गुरुदास कामत आणि मुरली देवरा यांचे प्रभावी गट कार्यरत होते. सध्याचे मुंबई विभागीय काँग्रेसचे अध्यक्ष माजी खासदार संजय निरुपम आणि कामत यांच्यातील मतभेदही समोर आलेत. मध्यंतरी निरुपम यांना हटविणार असल्याच्या बातम्या होत्या; पण काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मुंबई भेटीत निरुपम यांना अभय दिले होते. त्यामुळे नाराज झालेले कामत गेल्या काही दिवसांपासून पक्षापासून लांबच होते.
कामत यांनी एकेकाळी मुंबई एनएसयूआय, मुंबई विभागीय युवक काँग्रेस, अ. भा. युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा असाच अचानक राजीनामा दिल्याचा इतिहास आहे. यूपीएच्या काळात केंद्रीय मंत्रिमंडळाच्या फेरबदलात खाते बदलल्याने नाराज होऊन ते शपथविधी समारंभालाच गेले नव्हते. लोकसभा निवडणुकीत ईशान्य मुंबई मतदारसंघात शिवसेनेचे गजानन कीर्तिकर यांच्याकडून ते पराभूत झाले होते.
 
(कामतांचा 'संन्यास', आणि संजय निरुपमांचा 'इतिहास')
 
  •  
 

 

Web Title: Congress leader Gurudas Kamatra's decision to retire from politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.