‘केंद्र सरकारने भाईगिरी कधीपासून सुरू केली?’

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2021 05:50 AM2021-02-08T05:50:58+5:302021-02-08T07:27:23+5:30

कल्याण पूर्व भागातील एका खाजगी कार्यक्रमास पटोले आले असता कलाकारांनी केलेल्या ट्वीटवरुन त्यांनी केंद्रातील भाजप सरकारला शेतकरी आंदोलनप्रकरणी लक्ष्य केले.

congress leader nana patole slams modi government over celebrities tweets on farmer protest | ‘केंद्र सरकारने भाईगिरी कधीपासून सुरू केली?’

‘केंद्र सरकारने भाईगिरी कधीपासून सुरू केली?’

Next

कल्याण : शेतकरी आंदोलनावर केंद्र सरकारने सेलीब्रीटींना ट्विट करण्यास भाग पाडले. कलाकार हे ऐकाकाळी भाई लोकांच्या इशाऱ्यावर चालत होते. आता त्यांनी केंद्र सरकारच्या दबावाखाली येऊन ट्विट केले. त्यामुळे केंद्र सरकारने भाईगिरी कधीपासून सुरु केली, असा सवाल आता मोदी सरकारला जनता विचारात आहे असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रविवारी येथे केला.

कल्याण पूर्व भागातील एका खाजगी कार्यक्रमास पटोले आले असता कलाकारांनी केलेल्या ट्वीटवरुन त्यांनी केंद्रातील भाजप सरकारला शेतकरी आंदोलनप्रकरणी लक्ष्य केले. देशाचे गृहमंत्री अमित शहा हे कोकण दौऱ्यावर आले आहेत. त्यामुळे राज्यातील सत्ता बदलाची चर्चा सुरु झाली आहे. त्यावर पटोले म्हणाले की, देशातील सत्तेत बदल होऊ शकतो. राज्यातील सत्ता बदल होणार नाही. ही सत्ता पाच वर्षे टिकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पटोले यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन त्यांचे प्रवाहाविरोधातील राजकारण सिद्ध केले आहे. त्याविषयी विचारले असता त्यांनी सांगितले की, माझी लढाई जनतेची आहे. सत्तेची आणि खुर्चीची नाही. खुर्ची माझ्यामागे धावते, मी खुर्चीमागे नाही. मी जनतेच्या मागे धावतो. जनतेच्या प्रश्नांच्या माध्यमातून काँग्रेसला गतवैभव प्राप्त करुन देण्याचा प्रयत्न करणार असल्याचा दावाही पटोले यांनी केला आहे.

Web Title: congress leader nana patole slams modi government over celebrities tweets on farmer protest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.