'कोरोना लस' हा 'लाल किल्ल्या'साठीचा आटापिटा आहे का?; माजी मुख्यमंत्र्यांनी टोचलं 'इंजेक्शन'
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2020 01:53 PM2020-07-04T13:53:48+5:302020-07-04T13:57:56+5:30
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.
कोरोना संसर्गावर स्वदेशात बनविलेली कोव्हॅक्सिन ही पहिली प्रतिबंधक लस स्वातंत्र्यदिनी, १५ ऑगस्टपासून उपलब्ध करून देण्याकरिता इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्च या संस्थेने (आयसीएमआर) कंबर कसली आहे. पुणे येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी व भारत बायोटेक यांच्या सहकार्याने तयार होत असलेल्या कोव्हॅक्सिनच्या माणसांवरील चाचण्या ७ जुलैपासून सुरू कराव्यात असे पत्र आयसीएमआरचे संचालक डॉ. बलराम भार्गव यांनी संबंधित बारा संस्थांना पाठविले आहे. आयसीएमआरचा हा दावा अवास्तव असल्याचे म्हणत काँग्रेस नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.
आयसीएमआरचे संचालक डॉ. बलराम भार्गव यांनी या पत्रात म्हटले होते की, कोरोना संसर्गावर प्रतिबंधक लस तयार करण्याचा देशाचा हा पहिलावहिला व महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. त्या चाचण्यांचे निष्कर्ष काय येतात याकडे केंद्र सरकारचे लक्ष आहे. कोव्हॅक्सिन लसीच्या माणसांवर चाचण्या करण्याच्या कामात सहभागी असलेल्या १२ संस्थांनी आपले प्रयोग जलद गतीने पार पाडावेत. येत्या १५ ऑगस्टपासून ही लस उपलब्ध करून देण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे असे या संस्थांना कळविण्यात आले होते. या मानवी चाचण्या पार पाडण्याची जबाबदारी भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड (बीबीआयएल) या कंपनीकडे सोपविण्यात आली आहे.
यावरून माजी मुख्यमंत्र्यांनी टीका केली. त्यांनी ट्विट केलं की,''कोव्हीड-१९ साठी लस १५ ऑगस्ट पर्यंत तयार होईल हा #ICMR चा दावा अवास्तव आहे. लॉकडाऊनचा गोंधळ, कोलमडलेली अर्थव्यवस्था, गलवान खोऱ्यातील नामुष्की या पार्श्वभूमीवर मोदींना लाल किल्ल्यावरून एखादी मोठी घोषणा करता यावी यासाठी हा आटापिटा आहे का? आरोग्य मंत्र्यांनी स्पष्टीकरण केले पाहीजे.''
कोव्हीड-१९ साठी लस १५ ऑगस्ट पर्यंत तयार होईल हा #ICMR चा दावा अवास्तव आहे. लॉकडाऊनचा गोंधळ, कोलमडलेली अर्थव्यवस्था, गलवान खोऱ्यातील नामुष्की या पार्श्वभूमीवर मोदींना लाल किल्ल्यावरून एखादी मोठी घोषणा करता यावी यासाठी हा आटापिटा आहे का? आरोग्य मंत्र्यांनी स्पष्टीकरण केले पाहीजे.
— Prithviraj Chavan (@prithvrj) July 4, 2020
अन्य महत्त्वाच्या बातम्या
महेंद्रसिंग धोनी-साक्षीच्या लग्नाला 10 वर्ष पूर्ण; पाहा त्यांच्या लग्नातील Unseen Photo!
सचिन तेंडुलकरनं टेनिस स्टार रॉजर फेडररकडे मागितला सल्ला; पाहा Video
दिग्गजांशी तुलना करण्याची तुझी लायकी नाही; पाकिस्तानच्या कर्णधाराला घरचा आहेर
Photo : महेंद्रसिंग धोनीच्या फार्म हाऊसचा थाटच न्यारा; 7 एकर परिसरात बांधलाय स्वप्नांचा बंगला!
पाकिस्तान क्रिकेट संघाला भीकेचे डोहाळे; इंग्लंड दौऱ्यावर स्पॉन्सर्स मिळेना!