'साम, दाम, दंड, भेद वापरून केलेली मेगाभरती भाजपला चुकीची वाटू लागली'
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2020 01:19 PM2020-01-18T13:19:20+5:302020-01-18T13:23:51+5:30
तसेच, गुंड व भ्रष्टाचारी लोकांना जमा केल्याने अत्यंत हीन पातळीवर गेलेल्या भाजपने 'आतातरी सुधरावे' असा सल्ला सुद्धा यावेळी सावंत यांनी दिला.
मुंबई : भारतीय जनता पक्षाने सत्तेत येण्यासाठी विविध राजकीय पक्षांतून आयारामांना संधी दिली. त्यामुळे नुकसान झाल्याची उपरती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना आता झाली आहे. आकुर्डीतील पक्षाच्या बैठकीत भाजपात मेगा भरती ही मेगा चूक होती, अशी कबुली पाटील यांनी दिली. तर यावरूनच काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
भाजपने विरोधी पक्षातील नेत्यांना फोडण्यासाठी 'साम,दाम,दंड,भेद वापरून सत्तेसाठी मेगाभरती केली होती. मात्र आता त्याच भाजपला मेगा भरती ही चूक असल्याचे वाटत असल्याचा टोला सावंत यांनी भाजपला लगावला.
विरोधी पक्ष फोडण्यासाठी साम दाम दंड भेद वापरून सत्तेकरीता केलेली मेगाभरती आता @BJP4Maharashtra ला चुकीची वाटतेय. गुंड व भ्रष्टाचारीही जमा केल्याने अत्यंत हीन पातळीवर गेलेल्या भाजपाला GET WELL SOON हा सल्ला आहे. भाजपात गेलेले घरके न घाट के झाले पण काँग्रेसचे शुध्दीकरण मात्र झाले!
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) January 18, 2020
तसेच, गुंड व भ्रष्टाचारी लोकांना जमा केल्याने अत्यंत हीन पातळीवर गेलेल्या भाजपने 'आतातरी सुधरावे' असा सल्ला सुद्धा यावेळी सावंत यांनी दिला. तर भाजपात गेलेले 'घरके न घाट के' झाले असून काँग्रेसचे मात्र त्यामुळे शुध्दीकरण झाले असल्याचा टोला त्यांनी गयारामांना लगावला.