पाच वर्ष सत्तेत राहून भाजप विटीदांडू खेळत होते का? : सचिन सावंत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2020 02:19 PM2020-02-20T14:19:50+5:302020-02-20T14:28:54+5:30

भाजपने न्यायव्यवस्था, शहिदांचा आणि प्रमाणिकपणे तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांचा अपमान केला असल्याचा आरोपही सावंत यांनी केला आहे.

Congress leader Sachin Sawant has criticized the BJP | पाच वर्ष सत्तेत राहून भाजप विटीदांडू खेळत होते का? : सचिन सावंत

पाच वर्ष सत्तेत राहून भाजप विटीदांडू खेळत होते का? : सचिन सावंत

Next

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्या पुस्तकात 26/ 11 च्या हल्ल्याबाबत काही खुलासे करण्यात आले आहेत. या आधारे भाजपकडून या हल्ल्याच्या फेरचौकशीची मागणी करण्यात आली आहे. यावरून काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

दहशतवाद्यांना पाठीशी घालण्यासाठी वकिलांवर दबाव आणणाऱ्या, प्रज्ञा ठाकूर यांना लोकसभेची उमेदवारी देणाऱ्या भारतीय जनता पार्टीने 26/ 11 च्या हल्ल्याबाबतची फेरचौकशीची करण्याची मागणी करणे, म्हणजे अशी हस्यास्पद दुसरी कोणतेही मागणी असू शकत नाही. तर गेली पाच वर्षे सत्तेत असताना भाजप विटीदांडू खेळत होते का ? असा खोचक टोला सावंत यांनी भाजपला लगावला आहे.

तसेच जे राकेश मारिया यांच्या पुस्तकात लिहलं आहे, तेच अजमल कसाबच्या चार्जशीट मध्ये नमूद करण्यात आले आहे. खोटा प्रचार करतांना भाजपला लाज वाटली पाहिजे.भाजपने न्यायव्यवस्था, शहिदांचा आणि प्रमाणिकपणे तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांचा अपमान केला असल्याचा आरोपही सावंत यांनी केला आहे.

Web Title: Congress leader Sachin Sawant has criticized the BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.