विदर्भवासी कॉंग्रेस नेत्यांचा स्वपक्षीयांवर हल्लाबोल
By Admin | Published: August 2, 2016 11:07 PM2016-08-02T23:07:50+5:302016-08-02T23:07:50+5:30
स्वतंत्र विदर्भ आणि अखंड महाराष्ट्राच्या मुद्द्यावरुन राज्यातले राजकारण तापले असताना कॉंग्रेस पक्षातदेखील मतभेद दिसून येत आहेत. विदर्भातील कॉंग्रेस नेत्यांनी अखंड महाराष्ट्राची
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. २ - स्वतंत्र विदर्भ आणि अखंड महाराष्ट्राच्या मुद्द्यावरुन राज्यातले राजकारण तापले असताना कॉंग्रेस पक्षातदेखील मतभेद दिसून येत आहेत. विदर्भातील कॉंग्रेस नेत्यांनी अखंड महाराष्ट्राची भुमिका घेणारे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे, विधानसभेतील विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्यावर नेत्यांवर तोफ डागली आहे. हे आपले नेते नसून ते ज्युनिअर आहेत. वैयक्तिक स्वार्थासाठी हे नेते अखंड महाराष्ट्राची भुमिका घेत आहेत, असा आरोप माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, डॉ.सतिश चतुर्वेदी व डॉ.नितीन राऊत यांनी केला आहे.
विदर्भातील कॉंग्रेसचे नेते मुत्तेमवार, राऊत व चतुर्वेदी यांनी वेगळ््या विदर्भाच्या समर्थनार्थ भुमिका घेतली आहे व याअगोदरदेखील त्यांनी जाहीरपणे ती मांडली आहे. मंगळवारी या तिन्ही नेत्यांची नागपूरात बैठक झाली.
या बैठकीनंतर बोलताना त्यांनी स्वपक्षीय कॉंग्रेस नेत्यांवर जोरदार टीका केली. विदर्भातील काँग्रेसजनांचे मत जाणून न घेता चव्हाण, राणे व विखे पाटील यांनी विदर्भाला विरोध केला आहे. शिवसेनेसोबत अखंड महाराष्ट्राचा प्रस्ताव आणण्याचीदेखील तयारी केली होती. परंतु यासाठी त्यांनी केंद्रीय नेतृत्वाची परवानगी घेतलेली नाही. वैयक्तिक स्वार्थासाठी त्यांनी हे पाऊल उचलले आहे. या नेत्यांमुळे कॉंग्रेस रसातळाला गेली आह. चव्हाण, राणे, विखे-पाटील यांची ह्यहायकमांडह्णकडे तक्रार करणार असल्याचे मुत्तेमवार, चतुर्वेदी व राऊत यांनी सांगितले.