काँग्रेसची जाहीरनामा समिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2016 04:16 AM2016-12-22T04:16:55+5:302016-12-22T04:16:55+5:30
आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा तयार करण्यासाठी, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी एका
Next
मुंबई : आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा तयार करण्यासाठी, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी एका समितीची स्थापना केली. माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे या समितीचे अध्यक्ष असतील. समितीच्या सदस्यांमध्ये माजी
मंत्री शिवाजीराव मोघे, नसीम खान, आ. शरद रणपिसे, आ. रणजित कांबळे, आ. बसवराज पाटील, माणिकराव जगताप, उल्हास पाटील, आ. चंद्रकांत रघुवंशी, बबलू देशमुख, नरेंद्र खेडेकर, चारुलता राव टोकस, विश्वजित कदम यांचा समावेश आहे. भा. ई. नगराळे हे समन्वयक तर भीमराव डोंगरे सहसमन्वयक असतील. (विशेष प्रतिनिधी)